
उल्हासनगरात कोरोना लुटारुंची टोळी सक्रीय.
ज्येष्ट पत्रकार दिलिप मालवणकर यांचा आरोप
- by Reporter
- Jun 19, 2020
- 1477 views
उल्हासनगर (प्रतिनिधी): कोरोना अर्थात कोविंड - १९ सारख्या नैसर्गिंक आपत्ती चा आपल्या स्वार्थासाठी फायदा उचलणारी कोरोना लुटारुंची टोळी उल्हासनगरात सक्रिय झाली आहे. ही टोळी सर्व सामान्य रुग्णां कडून बिलाच्या माध्यमातून मनमानी बिल वसूल करत आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरीकां मध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात आयुक्त समिर उन्हाळे यांनी जातीने लक्ष घालून खाजगी रुग्णालय आणि लँब्स याची चौकशी करावी. अशी मागणी अन्याय संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ट पत्रकार दिलीप मालवणकर यानी केली आहे .
उल्हासनगर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.काल पर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा ८१५ वर स्थिर झाला.मात्र अद्याप कोरोना चाचणीचे अहवाल येणे बाकी आहेत.कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासन आणि नागरीक चिंतेत आहेत.उल्हासनगर महानगर पालिकेकडे स्वतःचे रुग्णालय नसल्याने प्रशासनाने शासकीय रुग्णालय कोविंड रुग्णालय म्हणुन ताब्यात घेतले आहेत.तर भिवंडी बायपास येथिल टाटा आमंत्रा आणि स्वामी टेऊराम आश्रम येथे क्वारंटाईन सेंटर सुरु केले आहेत.मात्र दिवसा गणिक कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे रुग्णालय आणि कोरोना चाचणी लँब अपुरी पडू लागली.रुग्णांची गैर सोय होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने अभ्यासिका ,खाजगी हाँटेल्स मध्ये रुग्णालय व्यवस्था काही खाजगी डॉक्टरांच्या मदतीने सुरु केले.तर मेट्रो पाँलिस या खाजगी पॅथालॉजी लँबला कोरोना चाचणी करण्याची परवांनगी दिली आहे .
खाजगी रुग्णालय आणि लँब च्या चालकांनी कोरोना आपत्तीचा फायदा उचलत कोरोना बाधित व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची पिळवणुक करण्यास सुरुवात केली आहे.खाजगी विलगिकरण कक्ष आणि रुग्णालया मध्ये कोणतीही वैद्यकीय सुविधा,सँनिटायझरींग व सुमार दर्जाचे जेवण पुरवून बिल मात्र अव्वाच्या-सव्वा बनवून वसूल केले जाते.त्यामुळे रुग्ण आणि त्याचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. केंद्र व राज्य शसनाने नुकताच एक अध्यादेश जारी केला आहे.खाजगी रुग्णालयांनी कोरोनाग्रस्त रुग्णा कडून बिलाची अर्धी रक्कम घ्यावी तसेच लँब्स वाल्यांनी चाचणीचे एका व्यक्ती कडून फक्त २५०० रुपये घ्यावेत. मात्र येथिल खाजगी डाँक्टर एका रुग्णासाठी ३० ते ४० हजार रुपयांचे बिल आकारते तर लँब्स एका व्यक्ति कडून २८००रुपये घेतात.विशेष म्हणजे सरकाने काही अटी शर्थींवर ज्या व्यक्तीला कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत.अश्या रुग्णाला घरी क्वारंटाईन करण्याची मुभा दिली आहे.परंतु आरोग्य प्रशासन शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतात.महापालिकेचा आरोग्य विभाग कोरोना लुटारुंच्या टोळीत सामिल आहे की काय ?अशी शंका येते.कोरोनाग्रस्त निधी शासना कडून महापालिका प्रशासनाला मिळत आहे.उद्या त्याचे आँडीट झाले तर मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला तर आश्चर्य वाटायला नको.
याबाबत अन्याय विरोधी संघर्ष समितीचे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार दिलिप मालवणकर यांनी सांगितले की,कोरोना सारख्या आपत्तींच्या वेळेत ही काही खाजगी डाँक्टरांकडून सामान्य रुग्णांना लुटले जात आहे.ही खेदाची बाब आहे.तशा तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत.ज्यांनी शासकीय आदेश धाब्यावर बसवत अधिक रक्कम वसूल केली आहे.ती त्यांना परत करावी.तसेच आयुक्त समिर उन्हाळे यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
रिपोर्टर