शासकिय दाखले वाटप विभाग तात्काळ सुरू करा -मनसेची मागणी.

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर तहसिल कार्यालयातुन कोरोनाच्या महामारी मुळे जवळपास तीन महिन्या पासून उत्पन्नाचा दाखला ,वास्तव्याचा दाखला यासह तहसिल कार्यालया मार्फत दिले जाणारे विविध शासकिय  दाखले देणे बंद आहे . तरी शासकिय दाखले वाटप विभाग तात्काळ सुरू करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी जिल्हा अधिकारी राजेश नार्वेकर व तहसिलदार विजय वाकोडे यांच्या कडे केली आहे.

कोरोना  सारख्या महामारी मुळे अजूनही बरेचसे नागरिक घरीच आहेत त्यांना विविध शासकिय कामासाठी शासकिय दाखल्याची गरज भासत आहे. परंतु हा विभाग पुर्णपणे बंद असल्यामुळे नागरिकांना शासकिय दाखले उपलब्ध होत नाहीत. व त्यामुळे नागरिकांची विविध कामे रखडली असून लवकरच शाळा व महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया ही सुरू होणार आहे.त्यामुळे आपल्या पाल्याच्या शाळा महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी तसेच शिष्यवृत्ती साठी पालकांना व विद्यार्थ्यांना विविध शासकिय दाखल्यांची गरज भासते. परंतु हा विभाग कोरोना च्या महामारी मुळे गेल्या तीन महिन्या  पासून बंद असल्यामुळे नागरिकांना कोणतेही शासकिय दाखले उपलब्ध होत नाहीत . त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे .  तरी हा विभाग तात्काळ सुरू करण्यात यावा व शहरातील नागरिकांना दिलासा दयावा अशी मागणी बंडू देशमुख यांनी ठाणे जिल्हाधिकारी   व तहसिलदार उल्हासनगर यांच्या कडे आपल्या निवेदना द्वारे  केली आहे..

यावेळी शहर अध्यक्ष बंडू देशमुख,अनिल गोधडे,तन्मेश देशमुख,दिपक राजपुत यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट