देशात कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात गुजरात सर्वात पुढे
- by Reporter
- Jun 18, 2020
- 548 views
नवी दिल्ली (प्रतिनिधी) : भारतातील कोरोना विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. मागील २४ तासांत देशात तब्बल १२ हजार ८८१ नवीन रुग्ण आढळले असून ३३४ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ६६ हजार ९४६ वर पोहोचली असून आतापर्यंत १२ हजार २३७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात सध्या १ लाख ६० हजार ३८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर १ लाख ९४ हजार ३२४ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
देशात महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलाय. महाराष्ट्रात बुधवारी ३३०७ रुग्णांनी नोंद झाली. तर,११४ लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण संक्रमितांचा आकडा हा १ लाख १६ हजार ७५२ झाला असून ५६०० हून अधिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
मात्र, अभ्यासातून धक्कादायक तपशील समोर आला- देशात गुजरातमध्ये मृत्यूची सरासरी १७ जून रोजी सर्वाधिक ६.२३ टक्के, तर महाराष्ट्राची ४.८८, दिल्ली ४.११ टक्के. तामिळनाडूने लॉकडाऊन लागू केल्यामुळे त्याचा मृत्यूदर सगळ्यात कमी म्हणजे १.०९ टक्का आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि इतर राज्यांत मृत्यूदर हा सतत वाढता आहे. २० एप्रिल रोजी मृत्यूदर हा ४.५४ टक्क्यांवरून खाली आला. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन मे महिन्यात म्हणाले होते, तसेच भारतात कोरोना हा संसर्गजन्य नसल्यामुळे कोणीही घाबरून जायचे कारण नाही.
रिपोर्टर