उल्हासनगर शहरातील आशा वर्करांच्या मानधनात वाढ . शिवाजी रगडे यांच्या प्रयत्नाना यश .
- by Rameshwar Gawai
- Jun 17, 2020
- 940 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात कोरोना च्या प्रादुर्भावाने हैदोस घातलेला असुन या संकट काळात ही आशा वर्कर यानी आपला जीव धोक्यात घालुन कोरोना च्या हॉसस्पॉट ऐरियात जावुन नागरिकांच्या तपासण्या करुन त्यांचे नाव पत्ते घेवुन महापालिकेला मदत करत होते . परंतु अशा संकट काळात जीव धोक्यात घालुन काम करणाऱ्या या आशा वर्कराना मानधन फक्त ३० रुपये मिळत होते . तेव्हा या आशा वर्करानी नगरसेविका सविता तोरणे व समाजसेवक शिवाजी रगडे आर पी आय चे ज्येष्ट नेते महादेव सोनवणे याना संपर्क साधुन आपल्या मानधना बाबत गऱ्हाणे मांडले . तेव्हा शिवाजी रगडे यानी आशा वर्करांची मांगणी आयुक्त . महापौर यांच्या समक्ष ठेवली आणि हिच मांगणी आयुक्त व महापौर यानी मान्य करुन प्रतिदिन ३०० रुपये मानधन केले आहे . त्यामुळे आता शहरातील ११० आशा वर्कराना या मानधनाचा फायदा होणार आहे . हे शिवाजी रगडे यांच्या प्रयत्नांचे यश असुन त्या आशा वर्करानी रगडे यांचे आभार मानले आहे .
उल्हासनगर शहरात कोरोना च्या प्रादुर्भावाने कहर केला असुन या कोरोना च्या काळात केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या आशा वर्कर याना महापालिकेने शहरातील कोरोना हॉसस्पॉट असलेल्या ऐरियात जावुन नागरिकांचे तापमान तपासणे त्यांचे पत्ते घेवुन महापालिकेला देणे हे काम जीव धोक्यस्त घालुन करत होते . परंतु या आशा वर्कराना महापालिका फक्त ३० रुपये मानधन देवुन त्यांची बोळवण करत होती . तेव्हा या आशा वर्करांची रास्त मांगणी समाजसेवक शिवाजी रगडे यानी आयुक्त समिर उन्हाळे व महापौर लिलाबाई आशान यांच्या समक्ष ठेवली . दरम्यान आयुक्त व महापौर यानी या मांगणीचा विचार करुन या आशा वर्कराना प्रतिदिन ३०० रुपये मानधन देन्याचे मान्य केले असुन तसा आदेश देखिल महापालिकेने काढला आहे . दरम्यान शहरातील ११० आशा वर्कराना याचा फायदा होणार असुन या आशा वर्करा मध्ये खुशी ची लहर निर्माण झाली आहे . तर त्यानी नगरसेविका सविता तोरणे . महादेव सोनवणे . व समाजसेवक शिवाजी रगडे यांचे आभार मानले आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम