उल्हासनगरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८१५ उपचार घेतात ३६२, करोना मुक्त ४२५, तर २८विकेट
- by Rameshwar Gawai
- Jun 17, 2020
- 747 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : शहरात काल २९ नवे कोरोना संक्रमीत रुग्ण आढळून आल्याने शहरातील करोनाग्रस्तांचा आकडा ८१५ वर पोहचला आहे.कोरोनाच्या या वाढत्या प्रकोपाने महापालिका प्रशासन आणि नागरीकां मध्ये नैराश्याचं वातावरण पसरलं आहे.
शहरात गत एक महिन्या पासून कोरोना संक्रमीत रुग्णां मध्ये सातत्याने वाढ होत आहे काल आनंद नगर,ब्राम्हणपाडा, सरस्वती नगर,कमला नेहरुनगर, रमाबाई आंबेडकर नगर,दशरामैदान ,बेवस चौक , गौतमवाडी परीसरातून आज २९ नवे रुग्ण आढळून आले.त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्तांची एकण संख्या ८१५ वर पोहचली आहे.त्यातच काल २२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४२५ झाली आहे.तर कोरोनाने आता पर्यंत २८ विकेट घेतल्या आहेत.महापालिका प्रशासनाला भाजपाचे स्थानिक आमदार व्यापारी संघटना नागरीक साथ देत नसल्याने महापालिका आयुक्त समिर उन्हाळे यांच्या जिवाला घोर लागला आहे.परिस्थिती आटोक्यात कशी आणायची.त्यात,
खाजगी रुगणालयं आणि लँब्स कडून शासकीय आदेश धाब्यावर .
उल्हासनगर शहरातील संशयीत रुग्णांची कोविंड -१९ ची चाचणी मेट्रोपाँलिस या खाजगी लँब कडून करण्यात येते. राज्य शासनाने काही दिवसां पुर्वी अध्यादेश काढून कोरोना चाचणी बाबतच्या फी ची २२००/- ,रु.रक्कम निश्चित केली आहे.मात्र या खाजगी लँब रुग्णां कडून, २८०० /- रु फी वसूल करुन शासकीय आदेश फाट्यावर मारत आहे.अनेक तक्रारी करुनही महापालिका प्रशासन खाजगी लँबच्या कारनाम्या कडं जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी केला आहे.शहरात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे कोरोना ग्रस्तांची संख्या ८१५ वर गेली आहे.त्यामुळे संशयीत रुग्णांची संख्या दिवसाला वाढत आहेत.शासकीय रुग्णालयां मध्ये कर्मचा-यांची संख्या कमी असल्यानं सर्वांचीच कोरोना चाचणी करणे शक्य नसल्यानं उल्हासनगर महापालिका प्रशासनाने मेट्रोपाँलिस या खाजगी प्रयोग शाळेला कोरोनाची चाचणी करण्यास परवांनगी दिली. मात्र या खाजगी लँब आणि रुग्णालय सामान्य रुग्णां कडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करीत असल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे आल्या.त्यानुसार शासनाने एक अध्यादेश काढून कोरोना चाचणी साठी २२००/-र.ईतकीच फी आकरण्याचे आदेश दिले आहेत. तरीही उल्हासनगरातील मेट्रोपाँलिस लँब सामान्य रुग्णांन कडून २८००/-रु. फी घेते.शिवाय पैसे भरल्याची पावती देखिल देत नाही. हे अतिरिक्त ६०० /- रुपये कुणाच्या घशात जातात याच्या चौकशीची मागणी केली आहे.ती मान्य होईल असं मनसेला वाटत नाही.कारण , याबाबत पालिका प्रशासनाचा जबाबदार अधिकारी ऐकुण घ्यायलाच तयार नाही.
गत काही दिवसां पुर्वी शहरातील खाजगी रुग्णालयांत होणा-या लुटी बाबत देखिल आरोप झालेले होते.मात्र कोणतीही कारवाई तर सोडाच,तक्रार करणारे जेष्ठ पत्रकार, माजी नगरसेवक दिलिप मालवणकर यांना नोटिस बजावली होती.तेव्हा त्यानी त्या नोटीसीचे उत्तर देवुन आपली तक्रार रास्त असल्याचे आयुक्ताना दाखवुन दिले होते .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम