वेळेवर निर्णय घेतल्यामुळे भारतात कोरोनाचा प्रसार मर्यादित ठेवण्यात यश -पंतप्रधान नरेंद्र मोदी
- by Adarsh Maharashtra
- Jun 16, 2020
- 1329 views
नवी दिल्ली, १६ जून:-आपण कोरोनाच्या प्रादुर्भावाला जितक्या लवकर आळा घालू तेवढ्या लवकर आपल्याला अर्थव्यवस्था रुळावर आणता येईल. कोरोनाला लवकर रोखले तर बाजार, कार्यालये आणि वाहतुकीची साधने सुरु करता येतील. त्यामुळे पुन्हा रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदींनी मंगळवारी २१ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या बैठकीत त्यांनी म्हटले की, आपण वेळेवर निर्णय घेतल्यामुळे भारतात कोरोनाचा प्रसार मर्यादित ठेवण्यात यश आले.
आता अनलॉक-१ होऊनही दोन आठवडे उलटले आहेत. या काळात आपल्याला आलेले अनुभव भविष्यात उपयोगी ठरतील. आज मला तुमच्याकडून जमिनीवरील प्रत्यक्ष परिस्थिती समजली. तुम्ही दिलेल्या सूचना पुढील रणनीती ठरवण्यासाठी उपयोगी पडतील, असे नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
देशातील अनेक राज्यांमध्ये शेती, बाग बागायती एमएसएमई हा अर्थव्यवस्थेचा मोठा भाग आहे. आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत या क्षेत्रांसाठी उपायांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या क्षेत्रांना फायदा होईल. तसेच उद्योगांना वेगाने क्रेडिट मिळेल, त्यामुळे लोकांना रोजगार मिळेल, असे मोदींनी सांगितले.दरम्यान, पूर्वोत्तर राज्ये आणि आदिवासी भागांमध्ये ऑर्गेनिक शेती करण्याची खूप संधी आहे. त्यासाठी प्रत्येक ब्लॉक आणि जिल्ह्यामधील खास उत्पादनांचा शोध घेतला पाहिजे. आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत ज्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्या एका निश्चित कालमर्यादेमध्ये प्रत्यक्षात उतरवल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे, असे मोदींनी सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम