आरोग्यमंत्री रुग्णालयात दाखल, ताप व श्वसनास त्रास
- by Adarsh Maharashtra
- Jun 16, 2020
- 1137 views
नवी दिल्ली, १६ जून :-दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ताप आणि श्वसनासाठी होत असलेल्या त्रासाच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सत्येंद्र जैन यांनी ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली.
विशेष म्हणजे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन सतत बैठकांना उपस्थित होते. गेल्या दोन दिवसांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतर अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. त्या बैठकीत सत्येंद्र जैन आरोग्यमंत्री म्हणून उपस्थित होते.
अचानक श्वास घेण्यात होत असलेल्या त्रासामुळे तसंच जास्त ताप आल्याच्या कारणास्तव दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी रात्री त्यांना दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण अचानक कमी झाल्याचंही सांगण्यात येत आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम