सिनेमासृष्टितील दिग्गज कलाकारांसह जाम प्राँडक्शनची कोरोना योध्याना गिताच्या माध्यमातून मानवंदना

"हम साथ है... विजय गवई लिखित गाण्याचं प्रकाशन गितातून मिळणार उत्पन्न मुख्यमंत्री निधिला.

उल्हासनगर/  प्रतिनिधी  :  जगात, देशात कोरोना महामारीचं संकट फोफावत चालले आहे. या संकटावर मात करण्यासाठी डाँक्टर, नर्सेस ,सफाई कर्मचारी, आणि पोलिस आपला आणि आपल्या परिवाराचा जीव धोक्यात घालून सामान्य जनतेच्या सुरक्षितते साठी अहोरात्र झटत आहेत.त्यांचे उपकार मानने,हा कृत्घन्नपणा ठरेल.या कोरोना योध्यांना मानवंदना देण्यासाठी उल्हासनगरातील विजय गवई यांनी "हम साथ है "लिहिले असून जाम प्राँडक्शनने संगीतबध्द केले आहे .तर यातून मिळणारे उत्पन्न मुख्यमंत्री निधीला देण्याचा त्यांचा मानस आहे.

२०२० हे वर्ष सर्व विश्वाला घातक ठरल असुन  कोरोना म्हणजेच  कोविड १९ हा विषाणू संपूर्ण विश्वात हाहाकार माजवत आहे.  कित्येक लोक त्याला बळी पडले आहेत तर देशात सर्वत्र लॉकडाऊन आहे खूप भयंकर विदारक परिस्तिथी निर्माण झाली आहे जो तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घरात सुरक्षित राहत आहे पण फक्त डॉक्टर, पोलिस , सफाई कामगार हा योद्धा वर्क बुक ठोकून कोरोना  च्या विरुद्ध मैदानात उतरलाय स्वतःची परवा न करता परिवाराची ही परवा न करता कुणा साठी तुमच्या आमच्या साठी तर या योध्याना मानवंदना देण्यासाठी अक्षय गवई व मोहित जेटली या दोघांच्या संकल्पनेतून jamm time production. च्या माध्यमातून "" हम साथ है "" हे विजय गवई लिखित गीत ज्याला मोहित जेटली, सेजल साकेत साक्षी तिवारी, राग ओंगाकू आणि सन्नी भतिया यांनी स्वरबध्द केलं आहे, ते २९ मे रोजी आपल्या भेटीस आले आहे.

 विशेष म्हणजे या  संकल्पनेला सिनेसृष्टीतील दिग्गज अनिकेत केळकर, प्रथमेश परब सायली संजीव,राहुल ठोंबरे,अर्बाज शैख,सुयोग गोरे,भूषण पटिल,माधुरी पवार,प्रसाद सुर्वे,आशिष जोशी,तृष्णा चंदात्रे,शिवाली परब,प्रिथ्विक प्रताप,अक्षय पाटिल,श्रद्धा इताडकर, श्रद्धा पवार, निता शिलिंमकर यांनी सपोर्ट केला आहे आणि भारतीय लक्षकर अतुल सरदार महाराष्ट्र पोलिस प्रशांत जाधव, प्रमोद विठ्ठल गायकवाड़,महेश जाधव यांनी सुध्दा  सपोर्ट केला आहे.  या  गीतातून जे ही मानधन जमा होईल ते मानधन ही टीम एखाद्या हॉस्पिटल ला किंवा मुख्यमंत्री निधीला जमा करणार आहेत तर चला

" हम साथ हैं " या गीताला जास्तीत जास्त शेयर करूया आणि या योध्याना  आपण सर्व या गीताच्या माध्यमातून मानवंदना देऊया तुम्ही लढा आमच्या साठी आम्ही सुरक्षित राहतो तुमच्या साठी.

संबंधित पोस्ट