अशोका फाऊंडेशनच्या वतीने आशा वर्कराना जीवनावश्यक वस्तुचे वाटप .

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात कोरोना बाधितांची संख्या सातशेच्या  वर गेलेली आहे . त्याच अशा धोकादायक स्थितीत शहरातील आशा वर्कर या घरोघरी जावुन नागरिकांचे तापमान व त्यांचे नाव पत्ते घेवुन महापालिकेला मदत करतात . तर महापालिका या आशा वर्कराना काय देते तर फक्त प्रतिदिन ३० रुपये मानधन . या बिचाऱ्या जीव धोक्यात घालुन काम करतात . परंतु त्यांच्या परिवाराचा व त्यांच्या घराचा कोणीच विचार केला नाही . दरम्यान अशोका फाऊंडेशन चे अध्यक्ष शिवाजी रगडे यानी हेल्थ पोस्ट ३ च्या आशा वर्कराचा विचार करुन त्याना जीवनावश्यक वस्तु चे वाटप करुन व आर्थिक मदत करुन आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे .

उल्हासनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसे दिवस वाढत चालला  आहे . याच अतिसंवेदन शील काळात आशा वर्कर प्रतिदिन फक्त ३० रुपये ऐवढ्याच्या तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत . या आशा वर्कर कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या एरियात जावुन नागरिकांच्या तपासण्या करुन नाव पत्ते लिहुन घेवुन महापालिकेला मदत करतात . दरम्यान लॉकडाऊन असल्याने त्यांचे पती देखिल घरीच असल्याने त्याना आर्थिक चणचणी सोबतच राशन पाण्याचा प्रश्न ही भेडसावत होता . तेव्हा अशोका फाऊंडेशन चे अध्यक्ष शिवाजी रगडे यानी हेल्थ पोस्ट ३ च्या  या आशा वर्कराना मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयाच्या प्रांगणात नगरसेविका सविता तोरणे . माजी नगरसेवक आणि आर पी आय चे ज्येष्ट नेते महादेव सोनवणे . समाज सेवक गौतम ढोके . यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तुचे वाटप करुन त्याना फुल नाही फुलाची पाकळी म्हणुन आर्थिक मदत ही केली आहे तर  जीवनावश्यक वस्तुचे वाटप करताना फिजिकल डिस्टंसिंगच्या  नियमाचे  ही पालन करन्यात  आले . अशोका फाऊंडेशन चे विकास ढोके प्रविण घणबहाद्दुर,सुनिल खांडेकर ,मंगेश भालेराव . समाधान . विक्की सोनवणे . बाळु खरात आणि अन्य पदाधिकारी यानी या वस्तु वाटप कार्यक्रमात सहभाग घेवुन कार्यक्रम यशस्वी केला .  

संबंधित पोस्ट