धरण उशाला कोरड घशाला.काकोळे गांवच्या पाण्याची समस्या गंभीर .

२ ते ३ किलोमीटर लांब जाऊन पाणी भरावं लागतं, स्वतःचे धरण असुन प्यायला पाणी मिळत नाही...

उल्हासनगर / प्रतिनिधी : वालधुनी नदी
काठी मलंगगड परिसरात असलेल्या
काकोळे गावकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन  करण्याची पुन्हा एकदा वेळ आली आहे,

धरण उशाला अन कोरड घशाला असे बोलायची काकोळे ग्रामस्थ वासीय नारी
शक्तिवर पाळी आली आहे, शेतकऱ्यांच्या वडीलोपार्जित ७/१२ शेत जमीनीवर बळजबरीने लादलेले प्रस्तावित एम आई डी सी भुसंपादने रद्द करण्यासाठी मलंगगड व तावली डोंगर दर्याखोर्यातुन वाहणारी वालधुनी नदी व उपनद्या, ओढे, विहिरी अशी जलसंपदा प्रदुषणामुळे व वाढत्या औद्योगिकी करणामुळे नष्ट होत आहे त्यांच्यासंवर्धनासाठी व संरक्षणासाठी,मलंगगड परिसरातील गावपाड्यांच्या पाणी समस्या सोडवण्यासाठी,
गुरचरण जमीन शेतकऱ्यांना व आदिवासी ठाकरं समाजाला वनहक्क कायद्याने वनपट्टे मिळवून देण्यासाठी,गावोगावी रस्ते, पाणी, आरोग्य शिक्षण बेरोजगारी अशा भेडसावणाऱ्या गंभीर समस्यासोडवण्यासाठी, ह्या आधी सुद्धा आमरण उपोषण पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय अंबरनाथ येथे बेमुदत सुरु केले गेले होते, आज पुर्ण १  वर्ष झाले आश्वासन देऊन, मात्र प्रांत  अधिकारी, तहसीलदार,  गटविकास अधिकारी यानी आश्वासन दिले होते की ८  दिवसांत पाणी प्रश्न सोडवु, तरीही काही झाले नाही, ऐन पावसाळ्यात तलावा शेजारी असलेल्या रेलनीर कंपनी  समोर पाणी हक्क आंदोलन करण्यात आले होते, त्या वेळी सुद्धा पोलिस प्रशासनाने आश्वासन देऊन आंदोलन  मागे घेण्यास भाग पाडले होते, त्या नंतर  सुद्धा आमचेच धरण असुन आमच्याच गावात एक थेंब सुद्धा पाणी मिळत नाही, महिलाना, आदिवासी याना  वणवण भटकावे लागत आहे, वालधुनी नदी असुन व ब्रिटिश कालीन काकोळे धरण असुन सुद्धा स्थानिक प्रशासन गावचे पाणी प्रश्न सोडवु शकले  नाही  म्हणुन, समस्त काकोळे ग्रामस्थ, मुले, आबालवृद्ध, वडीलधारे व महिलानी मिळून निर्णय घेतला की आता माघार नाही,

आज कोरोना महामारी च्या वेळी प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, खासदार आमदार अधिकारी टीवी पेपर पोलिस पत्रकार आमची बारकी पोर सुद्धा, सगळेच आम्हाला सांगतात कि हात धुवा हात धुवा... परंतु २  ते ३  किलोमीटर लांब  जाऊन पाणी भरावं लागतं आहे , आम्हाला प्यायला, वापरायलाच पाणी मिळत नाही तर हात धुवायला कुठून मिळणार?असा प्रश्न येथिल रहिवाश्यानी केला आहे . 

संबंधित पोस्ट