
उल्हासनगरात कोरोनाग्रस्त आकडेवारी वरून संभ्रम दररोज प्रसिद्ध होणारी आकडेवारी शास्वत की अशास्वत.
सोशल मिडीयावर आरोग्यधिकारी आणि बाधित रुग्णांच्या नातेवाईकांंच संभाषण व्हायरल.
- by Rameshwar Gawai
- Jun 12, 2020
- 1293 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : शहरात करोना बाधित रुग्णांची आकडेवारी सतत वाढत असल्यानं मनपा आरोग्य विभागाचे धाबेदणानले आहेत.नागरीक हि हवालदिल झाले आहेत.मात्र काही दिवसां पासून सोशल मिडीयावर दररोज प्रसिद्ध होणा-या आकडेवारी बाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे. त्यामुळे नागरीकां मध्ये आकडेवारी वरून संभ्रम निर्माण झाला आहे.
गत दोन महिन्यां पासून शहरात करोना बाधित रुग्णांचा संख्येत कमालीची वाढ झाली आहे.आज रोजी करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा सहाशेच्या वर गेला आहे.यापैकी ५०% रुग्ण बरे झाले आहेत तर २५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
उल्हासनगर मनपा प्रशासन करोनावर मात करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे.वाढत्या संख्येनुसार हाँस्पिटल आणि डाँक्टरसह स्टाफची व्यवस्था करण्यात आली आहे.कंटंमेन्ट झोन जाहिर करण्यात आले आहेत.
आशा वर्कर्स आणि कंटेमेंन्ट झोन मधिल संशियतांची दररोज आरोग्य चाचणी केली जाते.त्या अहवाला नुसार आरोग्य विभाग करोना बाधितांची आकडेवारी प्रसिद्ध करते.दोन आठवड्यां पुर्वी शहरात एकुण ४५ नवे रुग्ण आढळून आले आणि प्रशासनाची भंबेरी उडाली.यावर स्पष्टीकरण देतांना आरोग्य विभागाने हि चार दिवसांची प्रलंबित आकडेवारी असल्याच सांगितलं. दररोज प्रसिद्ध होणा-या करोना बाधित रुग्णांच्या आकडेवारी बाबत सोशल मिडीयावर शंका उपस्थित होऊ लागल्या त्यामुळे पालिका प्रशासनाची विश्वासहर्ता पणाला लागली आहे.
उल्हासनगरातील एका महिलेचे पाँझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन रिपोर्ट आले आहेत.सदर महिलेचा भाऊ आणि आरोग्य विभागातील कर्मचारी यांचं संभाषण सोशल मिडीयावर फिरत आहे.यात या दोन रिपोर्ट बाबत माहिती देतांना गडबडला आहे.तर कँम्प नं -२ येथिल महिलेचा मृत्यु नंतर पाँझिटिव्ह अहवाल आला आहे. आकडेवारी बाबत शंका घ्यायला हि दोन उदाहरणे पुरेशी आहेत.विशेष म्हणजे जे रुग्ण पाँझिटिव्ह आहेत .त्यांच्या हातात रिपोर्ट दिला जात नाही.अशीही ओरड होत आहे.त्यामुळे नागरीक संभ्रमात सापडले असून शहरातील करोनाची आकडेवारी खरी की खोटी ?अशी शंका नागरीकां कडून उपस्थित केली जात आहे. याबाबत मनपा आरोग्य अधिकारी डाँ सुहास मोहनाळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम