उल्हासनगर महापालिकेने आशा वर्करांचे मानधन वाढवावे .

उल्हासनगर / प्रतिनिधी  : कोरोनाच्या या संकट काळात आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून घरोघरी जावुन कंटेन्मेंट झोन मध्ये राहणाऱ्या  नागरिकांचा सर्व्हे करणाऱ्या आशा वर्करला प्रतिदिन फक्त  ३०  रुपये मानधन देण्यात येते आहे, हे मानधन अत्यंत अल्प  असून शासन कुठे तरी या आशा वर्करांवर  दुर्लक्षित करीत असल्याचा आरोप होतआहे यासंदर्भात मानधन वाढविण्यासाठी महापालिका  आयुक्त समीर उन्हाळे आणि महापौर लिलाबाई आशान यांच्याकडे आशा वर्करानी मानधनात वाढ करन्याची  मांगणी केली  आहे.  दरम्यान बाजुच्याच अंबरनाथ नगरपालिकेने या आशा वर्कराना प्रतिदिन २५० रुपये मानधन जाहीर केले आहे . या आशा वर्करानी एक दिवस काम बंद आंदोलन केले होते . त्यामुळेच त्या नगरपालिकेने आशा वर्करांच्या मानधनात वाढ केली . अशाच प्रकारे उल्हासनगर मधील आशा वर्करानी देखिल आपले काम बंद आंदोलन केले तर महापालिका वठनीवर आल्या शिवाय राहणार नाही . 

उल्हासनगर मध्ये आज कोरोना बाधित  रुग्णांची संख्या ७००  च्या जवळ  गेली आहे या परिस्थितीत घरोघरी जाऊन नागरिकांचा सर्व्हे करून लक्षण सदृश्य नागरिकांना शोधुन याची माहिती आरोग्य विभागाला देऊन कोरोना संसर्ग रोखण्यात महत्वाची भूमिका या आशा वर्कर पार पाडत आहे

काल  हेल्थ पोस्ट ३  च्या आशा वर्करानी  टीओके नगरसेविका सविता तोरणे.   समाजसेवक शिवाजी रगडे,आर पी आय  ज्येष्ठ नेते महादेव सोनवणे यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले, प्रतिदिन २००रु प्रमाणे किमान प्रतिमाह ६००० रु मानधन कोरोना काळात देण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे . 

 तर महापालिका  आयुक्त समीर उन्हाळे आणि महापौर लीलाताई आशान यांच्याशी या संदर्भात चर्चा केली असता त्यांनी मानधन वाढविण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती शिवाजी रगडे यांनी दिली आहे .

संबंधित पोस्ट