
उल्हासनगर महापालिकेने धोकादायक इमारतीना दिल्या नोटीसा .
- by Rameshwar Gawai
- Jun 10, 2020
- 624 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात धोकादायक व अतिधोकादायक इमारती मोठ्या प्रमाणात असल्याने या इमारतीना महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत . तर ३० अतिधोकादायक इमारतीवर महापालिकेचा लवकरच बुलडोझर फिरणार आहे . तर १४८ धोकादायक इमारतीपैकी ज्या इमारती दुरुस्त करन्या लायक आहेत . त्या इमारतीच्या दुरुस्तीचा खर्च त्या इमारतीत राहणाऱ्या रहिवाश्यानी करायचा आहे .
उल्हासनगर शहरात प्रमाणा पेक्षा धोकादायक व अतिधोकादायक इमारती आहेत . या इमारतीना महापालिका दरवर्षी नोटीसा बजावत असते . त्याच प्रमाणे या वर्षी देखिल महापालिकेने नोटीसा देवुन आपले कर्तव्य बजावले आहे . तर यातील काही इमारती मधील रहिवाशानी इमारती खाली देखिल केल्या आहेत . तर ज्यानी इमारती खाली केल्या आहेत त्या इमारती मधिल रहिवाशाना त्यांचे पुनर्वसन आणि त्याना घर भाडे देन्याचे आश्वासन तत्कालीन मंत्री रविंद्र चव्हाण यानी दिले होते . परंतु त्याना अद्याप पर्यंत कोणतीच मदत झाली नाही .
दरम्यान शहरातील धोकादायक अनेक इमारती सिल करन्यात आल्या असुन ज्या इमारती मध्ये रहिवाशी राहत नाहीत अशा इमारतीना नोटीसा लावुन त्याना दुरुस्ती करिता मुदत देन्यात आली आहे . तर यात इंजिनियर व आर्किटेक्चर यांच्या मदतीने दुरुस्तीची मुभा सुध्दा देन्यात आली आहे . परंतु नोटीसा बाबत रहिवाशी याना कोणती ही माहीती नाही . दरम्यान दुरुस्त होन्या लायक इमारती करिता महापालिकेने निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मांगणी समाजसेविका काजल मुलचंदानी यानी केली आहे . दरम्यान पावसाळ्यात मोठी दुर्घटना घडु नये म्हणुन महापालिका प्रशासनाने धोकादायक व अतिधोकादायक इमारतीना नोटीसा बजावल्या असुन ज्या इमारती अतिधोकादायक आहेत . त्या इमारती सर्व प्रथम निष्कासित करन्यात येतिल . आणि ही कारवाई पुढिल आठवड्यात करन्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम