कोविड सेंटरमध्ये कार्यरत असणारा सेवाभावी तरुण विशाल पाटील

पालघर (जयेश शेलार): पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार सुरू होण्याच्या अगोदर वाडा तालुक्यातील पोशेरी येथील आयडियल कॉलेजमध्ये कोरोना रुग्णांच्या संपर्कातील संशयितांना ठेवण्यासाठी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले व तेथे विविध विभागात काम करण्यासाठी तरुणांची भरती करण्यात आली. या तरुणांमध्ये तालुक्यातील नाणे गावातील विशाल पाटील हा तरुणही या कोविड सेन्टरमध्ये सेवा करण्यासाठी भरती झाला आहे व गेल्या दोन महिन्यांपासून या कोविड सेंटरमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह सेवा  आहे.
        वास्तविक कोरोनाबद्दल सर्वांच्या मनात तशी भीती! मात्र या कोविड सेन्टरमध्ये विविध पदांसाठी भरती करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशालने कोणताही विचार करता  कोविड सेंटरमध्ये सेवा करण्याचा निर्णय घेतला व सेवेला सुरुवात केली. विशाल मुळातच सेवाभावी वृत्तीचा तरुण आहे. त्याने आत्तातपर्यंत ३०.३५ वेळा रक्तदान शिबिरात जाऊन रक्तदान केले आहे, तर ४ वेळा प्रसूतीच्या वेळी रक्ताची आवश्यकता असणाऱ्या महिलांना रक्तदान करून त्यांचा जीव वाचविला आहे. तर मुळातच सेवाभावी स्वभाव असल्याने तो नेहमीच दुसऱ्यांना उपयोगी पडत असतो.
       


आत्तापर्यंत पोशेरी येथील कोविड सेंटरमध्ये फक्त अलगीकरण व विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्ती ठेवण्यात येत होत्या मात्र पोशेरी येथे कोविड रुग्णांसाठी ३०० बेडचे कोविड सेंटर व जिल्ह्यातील पोलिसांसाठी १०० बेडचे विशेष कोविड केअर सेंटरही सुरू करण्यात आले आहे. या सर्व सेन्टरमधील व्यवस्था बघण्याचे काम विशाल नियंत्रक म्हणून समर्थपणे सांभाळतो आहे. तर कोविडचे रुग्ण या सेंटरमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाल्याने आमची जबाबदारी वाढल्याचे विशाल सांगतो, मात्र तरीही आम्ही शेवटपर्यंत या सेंटरमध्ये सेवा देत राहणार असल्याचेही विशाल आवर्जून सांगतो.
        तर त्याच्या सोबत त्याचे सहकारी कैलास ओझरे, जना मामा, निलेश म्हसे, परेश घोगरे, बंधू वझरे, चंद्रकांत धोडी, सुनील गिरधले, सूरज घालनाक, रुपाली ओझरे, चैताली कडव, सुवर्णा मुकणे, भावना शेलार, ममता मालावकर, चंद्रभागा खरपडे यांसह अन्य सहकारी सेवाभावी वृत्तीने काम करीत आहेत. त्यागी वृत्तीने काम करणाऱ्या या सर्व कोविड योध्यांना व त्यांच्या कार्याला दैनिक आदर्श महाराष्ट्रचा सलाम

संबंधित पोस्ट