
उल्हासनगरातील कंटेन्मेंट झोनमधील टॉयलेटचे निर्जंतुकीकरण झुनो सरफेस मशीनद्वारे फवारणी
- by Rameshwar Gawai
- Jun 09, 2020
- 621 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण असलेले उल्हासनगरातील दाट लोकवस्तीचे परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत. या झोन मधील सार्वजनिक शौचालयातून विषाणू पसरण्याची शक्यता गृहीत धरून सर्व शौचालयाची झुनो सरफेस सॅनिटाईस मशिनद्वारे फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
उल्हासनगर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ५८० वर पोहचली आहे. यामध्ये ब्राम्हणपाडा, सम्राट अशोक नगर, आनंदनगर, संभाजी चौक, आदर्श नगर, गायकवाड पाडा, खन्ना कम्पाऊंड ह्या दाट लोकवस्तीच्या भागांचा समावेश आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक शौचालयांचा वापर होतो. या सार्वजनिक शौचालयांमधून कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याचे निष्पन्न होत आहे. यामुळे यावर उपाय म्हणून ठाणे आणि मुंबई महापालिकेच्या धर्तीवर आयुक्त समीर उन्हाळे यांनी झुनो सरफेस सॅनिटाईस मशिनद्वारे फवारणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारपासून फवारणीची सुरवात करण्यात आल्याची माहिती मुख्य आरोग्य अधिकारी विनोद केणे यांनी दिली. यावेळी अधिकारी एकनाथ पवार उपस्थित होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम