
एकाच दिवशी ८३ रुग्ण आढळताच, आरोग्य विभागाची उडाली तारांबळ. कोरोना बाधित रुग्णांची संख्या पोहचली ५८० वर .
- by Rameshwar Gawai
- Jun 08, 2020
- 1102 views
उल्हासनगर / प्रतिनिधी :उल्हासनगर शहरात रविवारी ७ जून रोजी एकदम ८३ नविन कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची तारांबळ उडाली आहे .याच स्पष्टीकरण देतांना ही आकडेवारी चार दिवसांची मिळून आहे.असे सांगण्यात आल्याने नागरीकां मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की उल्हासनगर महानगर पालिका क्षेत्रात ७ जून रोजी ८३ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून उल्हासनगर शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५८० पर्यंत पोहचली आहे.तर २७४ रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत २८३ कोरोना मुक्त रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे तसेच लक्षण नसलेले २१२ , सौम्य लक्षण असलेले ३२ ऑक्सीजन वर १२ रुग्ण आहेत. आय सी यू मध्ये १८ रुग्णावर उपचार सुरू आहेत. या कोरोनाच्या रुग्णांपैकी २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत २८३ रुग्णांना यशस्वीरित्या उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती महा पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनालकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
बदलापूर येथील ८ आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील २ रुग्णांवर, मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील २ अशा प्रकारे १२ रुग्णांवर उल्हासनगर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच कोविड रुग्णालयातून आणि राज्य विमा कामगार योजना रुग्णालयातून ७ जून रोजी ५९ कोरोना मुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले असे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी सांगितले. ७ जून रोजी ३ रुग्ण दगावल्याने कोरोना बाधित झालेल्या रुग्णाचा मृत्यूचा आकडा आता २३ पर्यंत पोहचला आहे.
कोविड रुग्णालय येथे ६६ , रुग्ण, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय येथे ६४ रुग्ण, टेउराम कोरोना केअर सेंटर येथे २८ रुग्ण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका येथे ८९ रुग्ण उपचार घेत असून इतर ठिकाणी २२ रुग्ण उपचार घेत आहेत. उल्हासनगर कोविड रुग्णालयात कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २ , मुंबई महापालिका क्षेत्रातील २ रुग्ण आणि बदलापूर नगर परिषद क्षेत्रातील ८ रुग्ण उपचार घेत आहेत. उल्हासनगर कोविड रुग्णालय येथे ६६ , राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात ६४ रुग्ण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका येथे ८९ रुग्ण, मुंबई सायन रुग्णालयात १ रुग्ण, ठाणे येथे ४ रुग्ण, कल्याण डोंबिवली येथे ३ रुग्ण, भिवंडी निजामपूर येथे १ रुग्ण, मुंबई येथे कामा रुग्णालयात ५ रुग्ण व वाशी येथील रिलायन्स रुग्णालयात ८ आणि कोरोना केअर सेंटर सेंट्रल पार्क येथे २८ रुग्णांवर उपचार सुरू असून २८३ रुग्णांना बरे करून घरी सोडण्यात आले असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी सांगितले आहे
महापालिका प्रशासना कडून दररोज कोरोना संबंधित आरोग्य पत्र प्रसारीत केलं जातं . त्यानुसार ३ जून रोजी नवे १५ रुग्ण एकुण ४२७ , ४ जून - नवे १५, एकुण ४४२ ,जून ५ नवे ४० रुग्ण , एकुण ४८२ , जून ६ रोजी नवे १५ रुग्ण - एकुण ४९७ तर ७ जून रोजी नवे ८३ एकुण ५८० रुग्ण.मग रविवारी प्रसारीत करण्यात आलेल्या आरोग्य वार्ता पत्रात चार दिवसांची प्रलंबित आकडेवारी असे नमुद करण्यात आल्याने नागरीकां मध्ये संभ्रम निर्माण झाला असून दर रोज प्रसारीत करण्यात येणा-या वार्ता पत्रा बाबत संशय व्यक्त केला जात असून महापालिका आरोग्य विभाग कोरोना बाबत चुकीचा संदेश तर नागरीकांना देत नाही ना? अशी चर्चा शहरात सुरु आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम