
उल्हासनगरातील कोविंड रुग्णालय आणि क्वाँरंटाईन सेंटर मधिल रुग्णांचे हाल . महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
- by Rameshwar Gawai
- Jun 07, 2020
- 1263 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : आज घडीला शहरातील करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ५०० वर पोहचला आहे.यात बरे होणा-या रुग्णांची संख्या समाधानाची असली ,तरी जे रुग्ण कोविंड रुग्णालयात आणि क्वाँरंटाईन सेंटर मध्ये दाखल आहेत.त्यांना पालिका प्रशासना कडून आवश्यक सुविधा वेळेत मिळत नसल्यानं,त्यांचे फार हाल होत आहेत. होत असलेल्या गैरसोयी बद्दल रुग्णांकडून प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला ,जात आहे.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पासून शहरात करोना बाधित रुग्ण आढळू लागले.त्यांच्या उपचारासाठी मनपा प्रशासनाने शासकीय प्रसुती रुग्णालय, राज्य कामगार रुग्णालय ताब्यात घेऊन तिथं कोविंड रुग्णालय सुरु केले . तसेच संसर्गित रुग्णांसाठी शहरातील स्वाँमी टेऊराम आश्रम शाळा ल भिंवडी बायपास जवळील टँरोंटन आमंत्रण येथे क्वाँरंटाईन सेंटर सुरु केले आहे. यात अनेक संशयीत रुगणांना क्वाँरंटाईन करण्यात आले आहे.तर शासकीय प्रसुती रुग्णालय आणि राज्य कामगार रुग्णालय तसेच डाँ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत करोना बाधित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.इंथ त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत.
मात्र गत काही दिवसां पासून क्वाँरंटाईन सेंटर व कोविंड रुग्णालयातील रुग्णांना वेळेवर पाणी, नाश्ता,जेवण मिळत नसल्याची तक्रारी नगरसेवक , समाजसेवकां कडे येऊ लागल्या.एकीकडं प्रशासन नागरीकांना स्वच्छता राखण्याचं आणि परीसर सँनिटायझर करण्याचं आव्हान करत असते ,मात्र रुग्णालय व क्वाँरंटाईन सेंटर परीसरात अनेक दिवसां पासून सँनिटायझरींग तर करत नाहीत.शिवाय येथिल शौचालये , बाथरुमांची अवस्था दयनीय आहे.त्यामुळे वाँर्डात घाणिचं साम्राज्य पसलं आहे.एवंढच काय तर, बेडवरील बेडशिट देखिल बदली केली जात नाही.कहर म्हणजे रुग्णांना शिळं जेवण पुरवले जाते. अश्या एक ना अनेक तक्रारी सोशल मिडियाच्या माध्यमातून समोर येऊ लागल्या.दररोज प्रशासनाचे वाभाडे निघू लागले.तरीही प्रशासन ढिम्मं आहे.
सदर तक्रारींची शहानिशा करण्यासाठी सेनेचे धंनजय बोडारे,शहर काँग्रेसचे सचिव रोहीत साळवे ,टिम ओ.के.चे शिवाजी रगडे यांनी टाटा न्आमंत्रण क्वाँरंटाईन सेंटर, कामगार हाँस्पिटल , आणि डाँ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका येथे जाऊन पहाणी केली.तेव्हा त्यांना रुग्णांच्या तक्रारीं मधिल सत्यता आढळून आली.त्यांनी आयुक्त समिर उन्हाळे यांची भेट घेऊन, हि बाब त्यांच्या लक्षात आणून देत,रुग्णांना सुविधा पुरविण्या बाबत निवेदनासह विनंती केली.काँग्रेसचे रोहीत साळवे यांनी तर ठिया आंदोलनाचा ईशारा दिला आहे.
वास्तविक पहाता उपचारासाठी व संशयीत म्हणून दाखल करून घेतलेल्या रुग्णांना उपचारा बरोबरच ,बाकीच्या सोयी सुविधा पुरविणे हे महापालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. यात ढिसाळपणा झाल्यास रुग्णांच्या मनात प्रशासना बाबत भितीचे आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता बळावली असून आयुक्त समिर उन्हाळे याबाबत कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवाजी रगडे , टिम.ओके. :- रुग्णालयात आणि क्वाँरंटाईन सेंटर मध्ये दखल झालेल्या रुग्णांची काळजी घेणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे.हि जबाबदारी पार पाडण्यात जो कुणी दोषी असेल त्यांच्यावर आयुक्तांनी कडक कारवाई करावी.
रोहीत साळवे , सचिव शहर जिल्हा काँग्रेस कमेटी : - दोन दिवसांत दोन्हीं ठिकाणातील रूग्णांची गैरसोय दुर झाली नाही,तर प्रशासना विरुद्ध ठिया आंदोलन करु.
धनंजय बोडारे ,नगरसेवक शिवसेना : - या गंभिर समस्ये कडे पालिका आयुक्तांनी वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे.अन्यथा नागरीकां मध्ये प्रशासना बाबत अविश्वास निर्माण होईल.सत्ताधारी म्हणून आम्ही प्रशासनाला सर्वात्परी मदत करण्यास तयार आहोत.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम