उल्हासनगर येथिल कोव्हिड रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सेसचे हाल .

उल्हासनगर / प्रतिनिधी :   कोरोनाचे संकट ओढावल्यापासून स्वतःचा जीव तळहातावर घेऊन नागरिकांचे रक्षणार्थ डॉक्टर,नर्सेस वॉर्डबॉय, आया, झुंज देतायेत. देशभरातून या कोविड यौध्दयांंवर ऋण व्यक्त करण्यासाठी फुले उधळून सलाम ठोकले जात आहेत. परंतु उल्हास नगरमधील कोविड रुग्णालयातील नर्सेस वॉर्डबॉय, आया यांची मात्र मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून पिळवणूक होतांना समोर येतंय.उल्हासनगर ४ येथील शासकीय रुग्णालय हे तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सर्वप्रथम कोविड रुग्णालय म्हणून उभं केले होते. यात अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर मधील कोरोनाग्रस्त रुग्णांची देखभाल व उपचार केले जातात. परंतु, स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्तांची सुश्रुशा करणार्या नर्सेसना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतोय. प्रशासनाच्या निष्काळजीपणा व बेफिकिरी विरोधात या नर्सेसने संताप व्यक्त केला आहे. 

या नर्सेस दीड महिन्यांपासून घर , परिवार सोडून या रुग्णालयात आपली सेवा देत आहेत. या संक्रमित काळात त्यांची राहण्याची व्यवस्था प्रशासनाने शहरातील ईगल आणि अँब्रोसिया हाँटेल्स मध्ये केली आहे.  परंतु, या हाँटेल्स व्यवस्थापनाकडून नर्सेस ना आता अप्रत्यक्षपणे बाहेर हाकलण्याच्या दिशेने अपमानास्पद वागणूक दिली जातेय. या नर्सेसच्या खोल्यांची विज घालवणे, गरम पाण्याचे गिझर, लिफ्ट बंद करणे , स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे यासारखा त्रास दिला जातोय. 

 या नर्सेसला मिळणारे जेवण वेळेवर मिळत   नसून , निक्रुष्ठ चपात्या, भाजी,  केस व घाण मिश्रित भात, पोहे पिण्यास अस्वच्छ पाणी मिळतेय. कमी श्रमबळामुळे त्यांना चतुर्थ श्रेणीची कामेदेखिल स्वतः लाच करावे लागत आहे. यासंदर्भात नर्सेसचे शिष्टमंडळ मनपा आयुक्त समीर उन्हाळे यांच्याकडे  दाद मागण्यासाठी गेले होत्या. परंतु, आयुक्तांनी त्यांना भेटण्यास सफशेल नकार दिला. आणि, कोविड प्रतिबंधक वैद्यकीय अधिकारी सुहास मोनाळकर यांना  भेटण्या साठी बोट दाखवले. मोनाळकर यांनीही त्यावर ठोस उपाय न सुचवता सारवासारव केली. या संतप्त प्रकाराबद्दल एकिकडे वेळीच या गैरसोयी दुर न केल्यास नर्सेसनी प्रशासना विरोधात आंदोलनाचा ईशारा दिलाय. तर दुसरीकडे , प्रशासनाच्या या निंदनीय व लज्जास्पद कारभारा बाबत आयुक्त समीर उन्हाळे यांच्या विरुद्ध  रोष व्यक्त होत आहे.

संबंधित पोस्ट