उल्हासनगर ४ मधील मुक्तीबोध स्मशानभुमीत हवा प्रदुषण नियंत्रण साहित्य बसविन्यात यावे.मनसेची मागणी.

उल्हासनगर / प्रतिनिधी :    उल्हासनगर ४ मधिल 'मुक्तीबोध स्मशानभुमी' शहराच्या अगदी मध्यभागी भर नागरी वस्तीत असल्यामुळे या स्मशानभुमीत अग्निदहन  अंत्यसंस्कार केल्या नंतर  त्यातुन होणारे  धुराचे  प्रदुषण तसेच या धुरा बरोबर उडणाऱ्या  राखेच्या धुळी कणांमुळे या विभागातील नागरिकांना श्वसनाच्या आजारासह विविध छोटया मोठ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. आता तर कोरोना सारख्या महामारीत मृत पावलेल्या मृतांचे मृतदेह सुध्दा याच स्मशानभुमीत अंत्यसंस्कारा साठी आणले जात आहेत.  त्यामुळे या विभागातील नागरिकांमध्ये अजून भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या स्मशानभुमीत मुंबई महापालिकेच्या धर्तीवर हवा प्रदुषण नियंत्रण साहित्य  बसविण्याची मागणी मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी आयुक्त समिर उन्हाळे व महापौर लिलाबाई आशान यांच्या कडे केली आहे.ही यंत्रणा बसविल्यास या स्मशानभुमीच्या माध्यमातून होणारे  प्रदुषण टाळता येईल व या विभागातील नागरिकांची या प्रदुषणातुन सुटका करता येईल.असेही बंडू देशमुख यांनी सांगितले आहे .  

या स्मशानभुमीत अगोदरच मुलभुत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. महा पालिके कडून नागरिकांना मिळणाऱ्या मुलभुत सुविधा जिवंतपणी अपुऱ्या पडत असताना कमीतकमी माणूस मेल्यानंतर तरी त्याचे हाल होऊ नयेत म्हणून प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याची मागणी देखिल देशमुख यांनी आपल्या पत्रात केली आहे.

 या स्मशानभुमीच अत्याधुनिकरण  करण्यात यावे आणि हया स्मशानभुमीची  देखभाल दुरुस्तीचे  काम कोणत्याही ट्रस्टला न देता ते महापालिकेच्या माध्यमातूनच करण्यात यावे.अन्यथा या विभागातील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आंदोलनाचा पवित्रा  घ्यावा लागेल असा ईशाराच मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

संबंधित पोस्ट