उल्हासनगर मध्ये सर्व व्यवहार सुरळीत सुरु . उडाला फिजिकल डिस्टंसिंगचा फज्जा .

उल्हासनगर / प्रतिनिधी : लॉक डाऊन मुळे मेटाकुटीला आलेले व्यापारी याना कधी आपले दुकाने सुरु होतात असे झाले होते . काही दुकानदार चोरुन लवपुन आपले दुकाने चालवत होते . मात्र ५ जुन पासुन शहरातील लॉक डाऊन हटले असुन दुकानदाराना दिलासा मिळाला आहे . सम आणि विषम या पध्दतीने दुकाने सुरु करन्यात आले आहेत .मात्र फिजिकल डिस्ट्न्सिंग चा फज्जा उडाला आहे . तर नागरिक देखिल कोणती ही काळजी न घेता बाजारात फिरताना दिसत आहेत . 

कोरोना व्हायरस मुळे उल्हासनगर मध्ये लॉक डाऊन असल्यामुळे शहरच पुर्णपणे बंद होते कोणतेच व्यवहार सुरु नव्हते . तर व्यापारी वर्ग हतबल झाला होता . दरम्यान रिक्षा चालक आणि अन्य व्यवहार बंद झाले होते . परंतु राज्य शासनाने व्यापारी दुकानदार  रिक्षा चालक व इतर महत्वाच्या व्यवसायीकाना नियम व अटी लावुन व्यापार व दुकाने सुरु करन्या करिता परवानगी दिली आहे . तेव्हा अटी व शर्ती नुसार दुकानदाराना आपापली दुकाने सुरु करन्याची मुभा दिली आहे . दरम्यान डाव्या बाजुला एक दिवस आणि उजव्या बाजुला एक दिवस दुकाने सुरु करन्याची परवानगी शासनाने दिली आहे . त्या नुसार ५ जुन रोजी शहरातील सर्व व्यवहार सुरु झाले असुन नागरिक देखिल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरुन फिजिकल डिस्टंसिंग फज्जा चांगलाच उडवत होते . तर रिक्षा चालकाना दोन प्रवाशाची परवानगी असताना तीन प्रवाशी  रिक्षात बसवुन रिक्षा चालकानी सुध्दा आपला धंदा सुरु केला आहे.  दरम्यान गजानन मार्केट . फर्निचर मार्केट . हे सुध्दा सम विषम या नियमाने सुरु करन्यात आले आहे . तेव्हा रस्त्यावर नागरिकांची चांगलीच गर्दी दिसत होती . तर शहरातील कॅंप ५ येथिल जिंस बाजार गाऊन बाजार हा सुध्दा सुरु झाला असुन जिंस बाजारातील मजुर गावी गेल्याने तो बाजार मात्र ठंडा दिसुन येत आहे . दरम्यान हा व्यवहार नॉन कंटेन्मेंट झोन मध्येच सुरु असुन कंटेन्मेंट झोन मध्ये मात्र सर्वच व्यवहार बंद आहेत .

संबंधित पोस्ट