
अलका चुग आत्महत्या प्रकरणाला कलाटणी विठ्ठलवाडी पोलिसांकडून गुन्हा वर्ग .
- by Rameshwar Gawai
- Jun 04, 2020
- 805 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : गत दोन महिन्यां पुर्वी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात एका विवाहित महिलेच्या आत्महत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र तपासात सातत्य नसल्याचा आरोप मृत महिलेच्या वडीलांनी वरिष्ठ अधिका-यांकडे केल्या नंतर हा गुन्हा विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यातून उल्हासनगर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता,मयत मुलिच्या परीवारानं व्यक्त केली आहे.उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक या प्रकरणाचा कसा तपास करतात.याकडं संपुर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, २२मार्च रोजी शहरातील ईगल इंफ्रा प्रा.लि. कंपनीचे भागिदार मुकेश लाल चुग यांची सुन अलका विनय चुग (२७) हिनं आत्महत्या केली होती.याची माहिती तिचे वडील अमरलाल वलेच्छा यांना मिळताच,त्यांनी कुटीर निवास उल्हासनगर -४येथे धाव घेतली.मयत अलका हिला प्रथम जवळच्या राम रक्षा हाँस्पिटल मध्ये नेण्यात आले.तिथून तिला शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले.तपासा दरम्यान तिला मृत घोषित केले.यासंदर्भात अमरलाल वलेच्छा यांच्या तक्रारी वरुन विठ्ठलवाडी पोलिसांनी चुग परीवारा विरोधात गुन्हा दाखल केला असून अलकाचा पती विनय मुकेश चुग याला अटक केले.आता तो आधारवाडी तुरुंगात आहे.तर तिचे सासरे मुकेश लाल चुग (५६) आणि सासू रेश्मा मुकेश चुग (५४) हि दोघं अटकपुर्व जामिनावर बाहेर आहेत.
मयत अलका उर्फ प्रणिका हिने आत्महत्या केली नसून तिचा हुंड्यासाठी खुन करण्यात आला असल्याचा आरोप करत,त्या दिशेने पोलिसांनी तपास करावा अशी मागणी मुख्यमंत्री, गृहमंत्री ,पोलिस आयुक्त ठाणे, आणि महिला आयोगाकडं केली होती.तसेच तपासात देखिल सातत्य नसल्याचं वरीष्ठांच्या निदर्शनास आणून दिले.
त्यामुळे अलका चुग संबंधित विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात नोंद असलेला गुन्हा उल्हासनगर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येऊन याप्रकरणाचा तपास वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.आता ते प्रकरणाचा कसा तपास करतात.आणि या प्रकरणाला काही कलाटणी मिळते का? याकडे शहराचे लक्ष लागले आहे.याबाबत विधीतज्ञ कल्पेश माने यांचा सल्ला घेतला असता ते म्हणाले की, एका पोलिस ठाण्यातून दुस-या पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग होणं,एक साधारण प्रक्रिया आहे.जर हा गुन्हा सि.बि.आय.किंवा अन्य शाखेकडं वर्ग झाला असता तर त्यात एक वेगळपण जाणवलं असतं. कदम साहेब देखिल या प्रकरणाला नवी कलाटणी देतील.असा विश्वास आहे.जर वरीष्ठांनी विठ्ठलवाडी पोलिसांवर विश्वास दाखवला असता तर त्यांनी हे काम अधिक जोमानं केलं असतं असे माझं मत आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम