कोरोना विषाणुशी लढणाऱ्या शासकिय कर्मचाऱ्याना एक कोटी रुपयाचे विमा कवच द्यावे . डॉ . विनोद मोहोड .

उल्हासनगर / प्रतिनिधी : राज्यभर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढतच चालला असुन राज्यात दिवसे दिवस रुग्णांचे आकडे वाढत आहेत . तेव्हा या कोरोना विषाणु चा सामना करणारे आरोग्य कर्मचारी . पोलिस कर्मचारी . होमगार्ड . अंगनवाडी सेविका . सेवा निवृत कर्मचारी हे जर या संक्रमणामुळे मृत्यु पावले तर त्याना शासनाने ५० लाख रुपयाचे विमा सरंक्षण दिले आहे . परंतु ही रक्कम तोकडी असुन या सर्व कर्मचाऱ्याना  एक कोटी रुपयाचे विमा सरंक्षण देवुन यातील एक महिन्याचे अतिरिक्त सानुग्रह अनुदान म्हणुन एक महिन्याचे वेतन देन्याची मांगणी महाराष्ट्र राज्य कॉस्ट्राईब कर्मचारी महासंघाचे सहसचिव डॉ . विनोद मोहोड यानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याना पाठवलेल्या निवेदनात केली आहे . 

राज्यभर कोरोना विषाणुचा  ससर्ग वाढत चालला असुन आपले सर्वच शासकिय कर्मचारी या विषाणुशी लढत आहेत .  विषाणुचे संक्रमण झालेल्या रुग्णावर उपचार करत आहेत . तेव्हा या विषाणुचा सामना करताना जर या शासकिय कर्मचाऱ्याचा मृत्यु झाल्यास त्या कर्मचाऱ्याना शासनाने त्यांच्या कुटूंबियाना ५० लाख रुपयाचे विमा कवच दिले आहे . परंतु ही रक्कम कमी असल्याने शासनाने या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियाना ५० लाख रुपया ऐवजी १ कोटी रुपयाचे विमा सरंक्षण देवुन यातील सानुग्रह अनुदान म्हणुन एक महिन्याचे अतिरिक्त वेतन देन्यात यावे अशी मांगणी महाराष्ट्र राज्य कॉस्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे सह सचिव डॉ . विनोद मोहोड यानी राज्याचे मुख्यमंत्री मा  उध्दव ठाकरे याना पाठवलेल्या निवेदनात केली आहे

संबंधित पोस्ट