ठाणे मनपाकडून गृहसंकुलांतील विक्री झालेल्या घरांचा ताबा घेण्याचा प्रयत्न; लोकांमध्ये संताप
- by Adarsh Maharashtra
- Jun 01, 2020
- 718 views
ठाणे, १ जून:- जिल्ह्यात रविवारी एकाच दिवशी सर्वाधिक ४८६ इतके नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांचा आकडा आठ हजार २६७ एवढा झाला आहे.
जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी १६ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा हा २५६ इतका झाला आहे. रविवारी ठाणे महानगरपालिका हद्दीत सर्वात जास्त १३१ रुग्ण सापडले. एकीकडे जिल्ह्यातील एकूण रुग्णांनी आठ हजारांचा टप्पा पार केला असताना दुसरीकडे ठामपातील रुग्णांनीही तीन हजारांचा तर कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण रुग्ण संख्येने एक हजारांचा आणि मिरा भायंदरने सातशेचा टप्पा पार केला आहे.नव्या रुग्णां मुळे ठामपातील एकूण रुग्णसंख्या तीन हजार ३२ वर पोहोचली आहे. ठामपा हद्दीत पाच जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ८९ झाला आहे. त्याचबरोबर १०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
ठाणे शहर, दिवा-मानपाडा रस्त्यांवरील नव्याने उभारण्यात आलेल्या गृहसंकुलांमध्ये विक्री झालेल्या आणि तयार ताबा अशा स्थितीत असलेल्या घरांमध्ये कोरोना रुग्णांचे निवारा केंद्र सुरु करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला. घोडबंदर, दिवा यासारख्या भागात मोठ्या विकासकांच्या गृहनिर्माण वसातींमधील तीन हजारांहून अधिक घरे कोरोना रुग्णांचं अलगीकरण, विलगीकरण त्यांच्यावर उपचार यासाठी अधिग्रहित केली जात आहेत.यासाठी मूळ मालकाची कोणतीही संमती घेतली जात नसल्याने संताप व्यक्त होतो आहे.अगदी अशीच घटना आज दिवा-मानपाडा रोडवर असलेल्या माय रुणवाल सिटीमध्ये घडली. या ठिकाणी जेव्हा महापालिकेचे अधिकारी आले तेव्हा त्यांच्यात आणि नागरिकांमध्ये वाद झाला. संमती नसताना तुम्ही विलगी करणासाठी घरं ताब्यात कशी काय घेऊ शकता असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. मात्र पालिकेचे कर्मचारी जेव्हा इमारतीत शिरु लागले तेव्हा नागिरकां मध्ये व त्यांच्यात वाद झाला कर्मचाऱ्यांनी आमच्यासोबत अरेरावी केली असा आरोप आता येथील नागरिकांनी केला आहे.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम