सिने अभिनेता सोनू सूदकडून उल्हासनगर-अंबरनाथ मधिल तृतीय पंथियांना धान्य वाटप.

उल्हासनगर / प्रतिनिधी :  कोरोना व्हायरस आणि लाँकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प   असुन   तृतीय पंथियावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यांना मदत म्हणून सिने अभिनेता सोनू सूद यांनी उल्हासनगर व अंबरनाथ शहरातील सुमारे २०० तृतीयपंथिया साठी धान्य पाठवून दिले.सोनू सुद यांचे मित्र राऊंड टेबल इंडीयाचे विकास व मुंबई ४१ आर असोसियेशन क्लब आँफ इडीयाच्या पदाधिका-यांनी रविवार ३१ मे रोजी वाटप केले.सोनु सूद याच्या या भेटीचा स्विकार करत तृतीयपंथियांनी आभार मानत त्यांना दुवा दिल्या.

संचारबंदी व लाँकडाऊनमुळे उल्हासनगर मधील ७२ दिवसां पासून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.यात व्यपा-यां पासून हात मजूरासह सर्वच बेरोजगा र आणि हातबल झाले आहेत.तृतीयपंथियांचा तर विचारच करायला  नको  त्यांच्याकडं     सरकारी ओळखपत्र नसल्यानं शिधापत्रिकाही नाही.त्यांना अन्न धान्य कोण देणार? शहरातील काही धार्मिक संस्था कडून दरम्यानच्या काळात जेवण वाटप करण्यात येत होतं आता तेही बंद करण्यात आल्यानं त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
काही दिवसां पुर्वी मुंबईतील परप्रांतीयांना गावी जाण्यासाठी अभिनेता सोनू सुद यांने स्वखर्चाने सोय केली होती.सुद यांना तृतीयपंथियांची व्यथा समजताच त्यांनी राऊंड टेबल इडीयाचे श्री. विकास आणि मुबंई ४१आर असोशिएशन क्लब आँफ इंडीयाच्या पदाधिका-यांशी चर्चा केली.उल्हासनगर आणि अंबरनाथ मधिल २२० तृतीयपंथासाठी धान्याच्या पँकेटस् ची व्यस्था केली.
कोणताही गाजावाजा नकरता रविवारी श्री.विकास आणि मुबंई ४१आर असोशिएशन क्लब च्या पदाधिका-यांनी शहरातील तृतीयपंथियांना अन्न धान्याचं वाटप केलं. नैसर्गिक आपत्तीच्या या संकटसमयी एकीकडं सशक्त समाजानं दुर्लक्षित केलेलं असतांना, चित्रपट सृष्टीतील एक अभिनेता आपली दखल घेतो.हे बघून त्या भारावून गेल्या.त्यांनी सोनू सुद यांना मनापासुन आशिर्वाद दिले.विद्या सागर देडे,सानिया शालिग्राम , सायरा शेख  आणि महक वाघ या उल्हासनगरातील तृतीयपंथियांनी विशेष आभार मानले.

संबंधित पोस्ट