करोना आडचं राजकारण उल्हासनगरातील जनता संभ्रमीत अंर्तगत राजकीय वादाचं प्रदर्शन

उल्हासनगर/ प्रतिनिधी  : शहरात करोनाग्रस्त बाधितांचा आलेख वाढत चालला आहे.करोनाच्या रुग्णांनी ३००आकडा पार केला आहे. त्यामुळे प्रशासन आणि जनते मध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.करोनाचा वाढता संसर्ग  सत्ताधारी - विरोधक यांनी आटोक्यात आणावा अशी शहरातील सामान्य जनतेची अपेक्षा आहे.मात्र काही राजकारणी करोना विप्पती काळात देखिल राजकारण करत असल्यानं जनता मात्र संभ्रमीत झाली आहे.
 याबाबत सविस्तर वृत्त असे की गत दोन आठवड्यां पासून शहरात करोना बाधित रुग्णां मध्ये सातत्याने वाढ होत आहे.त्यात महापालिकेच्या मालकीचे शहरात एकही रुग्णालय नसल्यानं, प्रशासनाला शासकीय रुग्णालयांवर आवलंबून राहावे लागत आहे.मनपा प्रशासनानं शहरातील दोन शासकीय हाँस्पिटल पैकी एकाचा कोविंड रुग्णालय म्हणून वापर सुरु केला आहे बाधितांची संख्या वाढत असल्यानं राज्य कामगार हाँस्पिटल ही ताब्यात घेतले आहे. भविष्यात रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मनपानं शहरातील खाजगी हाँस्पीटल ताब्यात घेण्याचा विचार केला .आणि इथूनच राजकारणाला सुरुवात झाली.सर्व प्रथम मनपा प्रशासनानं उल्हासनगर कँ. - ५ येथिल सर्वानंद हाँस्पीटल ताब्यात घेण्या बाबत पत्र व्यवहार करताच.शहरातील काही स्थानिक राजकारण्यांनी तिव्र विरोध दर्शविला.आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी प्रशासनावर झाडण्यात आल्या. यात काही डाँक्टरांना ओढण्यात आलं.हा वाद क्षमतो ना क्षमतो तोच स्थानिक राजकारण्यांकडून अनेक पर्याय सुचविण्यात आले.
सर्व प्रथम राष्ट्रीय छावा संघटनेचे निखिल गोळे यांनी शहरातील टाऊन हाँल व तरण तलाव ताब्यात घेऊन तिथं क्वाँरंटाईन सेंटर आणि कोविंड रुग्णालय सुरु करण्याची मागणी पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांना केली.हाच धागा पकडून काल टिम ओमी कलानी यांच्या शिष्ट मंडळानं आयुक्त समिर उन्हाळे यांची भेट घेऊन शहरातील बि.ओ.टी. तत्वावर दिलेल्या मनपाच्या सर्व मालमत्ता ताब्यात घेऊन तिथं कोविंड रुग्णालयं सुरु करावित अशी मागणी केली.यात प्रामुख्याने टाऊन हाँलचा समावेश आहे.टाऊन हाँल विद्यमान भाजपा आमदार कुमार आयलानी यांचा आहे.कलाणी आणि आयलानी याच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे.
 शहरातील करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव ही प्रशासनाची वाढती डोके दुखी आहे.मात्र करोनाच्या नावा आड चाललेलं राजकारण मनस्ताप वाढवणारं ठरणार आहे. रुग्णालय व क्वाँरंटाईन सेंटरची वाढत गरज लक्षात घेऊन पालिका प्रशासनानं काही शाळा आणि सामाजिक संस्थेच्या मालकीचे दवाखाने ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.स्थानिक राजकारण्यांनी हाँस्पीटल बाबत राजकारण करण्या ऐवजी प्रशासनानं सुरू केलेल्या रुग्णालयांना सुविधा पुरवाव्यात.कंटंमेन्ट परीसराला भेटी देऊन नागरीकांच मनोबल वाढवावं. अशी मागणी नागरीक करीत आहेत.

संबंधित पोस्ट