उल्हासनगरात स्वांतंत्र्यवीर सावरकरांची जयंती साजरी .

उल्हासनगर / प्रतिनिधी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३७  वी जयंती स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्या वतीने उल्हासनगर पुर्व येथे साजरा करण्यात आली.

लाॅकडाऊन असूनही सावरकर प्रेमी नागरीक सकाळी १०  पासून गटागटाने येऊन सावरकर यांच्या अर्धपुतळ्यास अभिवादन करीत होते.या वेळी सामाजिक कार्यकर्त्या कमल सोधी यांनी अर्सेनिक-३०  या रोगप्रतिकार शक्ती वाढविण्या-या १००  बाॅटल्स गोळ्या दिल्या. त्यांचे वाटप उपस्थित सावरकर प्रेमी,पत्रकार, फेरीवाले,गॅस सिलिंडर वाटप करणारे व नागरिकांना समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष पत्रकार दिलीप मालवणकर व श्रीमती कमल सोधी यांच्या हस्ते वाटण्यात आल्या. यावेळी शिवसेना नगरसेवक सुरेंद्र सावंत, समितीचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते, डाॅक्टर,पत्रकार व सावरकर प्रेमी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट