भिम आर्मी , ठाणे जिल्ह्याचे महाराष्ट्र शासनाला निवेदनाद्वारे जाहीर साकडे

उल्हासनगर / प्रतिनिधी :  संपूर्ण जगासहीत   आपला भारत देश व  आपले महाराष्ट्र राज्य कोरोना ( कोविड१९) ह्यांसारख्या वैश्विक महामारीने हतबल झालेले असून , कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण भारतात २५ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. असून , हा चौथा   टप्पा   ३१ मे पर्यंत लागू रहाणार आहे. ह्या कालावधीत सर्वप्रकारचे उद्योगधंदे ,कामकाज बंद आहे.अर्थात आपण कोरोनाचा नायनाट करण्याच्या अंतिम टप्प्यात असून , ही परिस्थिती निश्चितच सुधारेल पण ही सगळी परिस्थिती सुरळीत होण्यासाठी किमान वर्षभराचा तरी अवधी  लागणार आहे. अशा  भयावह परिस्थितीत गोरगरिबांचा  जगण्याचा मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला असून त्याच्या खाण्यापिण्याची सुद्धा भ्रांत पडलेली आहे.त्यातच त्याने घरात टीव्ही-फ्रीज-मोबाईल वगैरे काही वस्तू सुलभ हप्त्यावर  घेतलेली आहेत.तर काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी , काहींनी आजारपणासाठी , तर काहींनी मुलांच्या लग्नकार्यासाठी , काहींनी छोट्यामोठ्या घरगुती उद्योगासाठी , काहींनी रिक्षा,टेम्पो,ट्रॅक्टर साठी , तर काहींनी आपल्या शेतीच्या कामासाठी सरकारी बँकेतून , खासगी बँकेतून(बंधन , उज्वल , सूर्योदय अश्या काही खासगी कर्जवितरण करणाऱ्या  बँका) यांच्याकडून काही रक्कम व्याजाने काढली आहेत.आज त्यांच्यापुढे हे कर्ज फेडण्याचे मोठे आवाहन उभे राहिलेले आहे. जिथे ज्यांच्या खाण्यापिण्याचाच मोठा यक्षप्रश्न निर्माण झालेला आहे,त्यात त्याने ही कर्जफेड करावी कशी ? असा सवाल भिम आर्मीचे राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी केला आहे.म्हणून आमची मायबाप सरकारला जाहीर विनंती आहे की ,ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत आहे आणि कर्ज लाख-दीड लाखांच्या आत आहे ,अश्या सर्व कर्जदार गोरगरिबांचे कर्ज सरसकट माफ करण्यात यावे , आणि ह्या हातमजुरांना जीवन जगण्यासाठी एक संधी देण्यात यावी.,ह्या मागणीसाठी लवकरच भिम आर्मीच्या राज्यप्रमुख मा.नेहाताई शिंदे यांच्या सूचनेनुसार लवकरच ठाणे जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र राज्य शासनाला  एक निवेदन देण्यात येणार आहे.अशी माहिती ठाणे जिल्ह्याचे महासचिव मा.सुभाषचंद्र भोसले(आप्पासाहेब) यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

संबंधित पोस्ट