महापालिकेने जन्म मृत्यू नोंदणी विभाग सुरू करण्याची मनसेची मागणी.

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर महानगर पालिकेचा जन्म मृत्यू नोंदणी विभाग कोरोनाच्या महामारी मुळे जवळपास दोन महिन्या  पासून बंद असून तो तात्काळ सुरू करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी महापालिका आयुक्त समिर उन्हाळे यांच्या कडे केली आहे. कारण कोरोना  सारख्या महामारी मुळे बरेच नागरिक घरी असून जन्म मृत्यूचा दाखला मिळत नसल्यामुळे नागरिकांची विविध कामे रखडली आहेत. लवकरच शाळा ही सुरू होत आहेत आपल्या पाल्याच्या शाळा प्रवेशासाठी जन्म दाखल्याची गरज भासते हा विभाग दोन महिन्या  पासून बंद असल्यामुळे आपल्या पाल्याच्या शाळा प्रवेशाच काय होईल ही चिंता पालकांना सतावत असल्याचे बंडू देशमुख यांनी महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे .उल्हासनगर महापालिकेच्या वतिने लाॕकडाऊन झाल्यानंतर जन्म मृत्यू चे दाखले मिळविण्या साठीचे नागरिकांचे अर्ज जमा करण्यासाठी महापालिकेतील नागरी सुविधा केंद्राच्या बाहेर दोन  ते अडिच महिन्यापासून एक झोला ठेवण्यात आला होता. व तो ही आता ओसंडुन  वाहत आहे.हया अर्जांची छाननी करुन व काही नियमावली तयार करुन हा विभाग त्वरीत सुरू करण्यात यावा अशी मागणी बंडू देशमुख यांनी आयुक्तां कडे केली आहे.

संबंधित पोस्ट