उल्हासनगरच्या निवृत्त नागरिका कडून मुख्यमंत्री निधीला लाखाची मदत !

हिरुळकर परीवारा कडून माणूसकीचा परीपाठ

उल्हासनगर/ प्रतिनिधी  : शहरातील एका निवृत्त झालेल्या सामान्य  नागरिकानं करोना व्हायरसच्या पार्शवभुमिवर मदत म्हणून मुख्यमंत्री निधीला लाखाची मदत केली .त्यांंच नाव माधव हिरुळकर असं असून माटुंग्याच्या रेल्वे वर्कशाँप मधून अलिकडचं निवृत्त झाले आहेत.त्यांच्या या स्तुत्य निर्णयाचं शहरभर कौतुक होत असून, या परीवारानं माणूसकीचा नवा परीपाठ घालून दिला आहे.

 उल्हासनगर कँ. -४ अंबिकानगरचे जुने  रहिवाशी सौ. पुष्पा व माधवकाका हिरुळकर दांपत्य. माधवकाका हे  माटुंग्याच्या रेल्वे वर्क शाॅप मधून काही वर्षापूर्वी निवृत्त झालेले. अनेक असाध्य रोगांशी लढतांना  माधवकाका कित्येकदा स्वर्गाला हात लावून आलेत.पण या जिद्दी जोडप्याने जेव्हा कोरोना सारख्या जीवघेण्या विषाणूशी जग लढतांना पाहिलं तेव्हा त्यांनी ठरवलं, आपण मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना या लढाईत हातभार लावयचा.

 त्यांनी आपल्या तीन मुलींना कोविड-19  फंडाला मदत करण्यासाठी मसलत केली आणि एक मताने होकार मिळताच त्यांनी अंबरनाथ स्टेट बॅक पेंशन अकांऊट मधून रुपये 1 लाखांचा धनादेश मुख्यमंत्री कोविड- 19 फंडाला बहाल केला. आणि अवघा परीसर अवाक् झाला.या परीसरात अनेक आर्थिक दृष्टया सशक्त नागरीक राहातात.दंबग नगरसेवक राहातात थोडीशी मदत केली की, त्याचं फोटो सेशन करुन केलेल्या मदतीची जाहिरातबाजी करण्यात हि मंडळी धन्यता मानते.

वयाच्या 65 व्या वर्षी उदात्तपणे केलेल्या या जनसेवेचं कुठंही वाच्यता करण्यात आली नाही की मदती नंतर बडेजाव. यासाठी मोठं मन लागतं! निवृत्त माणूस म्हातार वयात आणि ते ही कोणता गाजावजा न करता फंडाला मदत करतात यापेक्षा अधिक काय सांगणे ? ते धाडस या मध्यमवर्गीय हिरुळकर कुटुंबाकडेच आहे. त्यांनी  निस्वार्थी समाजसेवेचा नवा परीपाठच शिकवला आहे.हा परीपाठा पासून किती जण निस्वार्थी समाजसेवेचा धडा गिरवततात. याकडं लक्ष लागलं आहे.

संबंधित पोस्ट