ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन बाबत केंद्र सरकारचा मोठा दिलासा, 31 जुलैपर्यंत वाढवली वैधता

 नवी दिल्ली - देशात कोरोनाचं संकट वाढत असल्याने लॉकडाऊनदेखील वाढवण्यात आलं आहे. गेल्या २ महिन्यापासून देशव्यापी लॉकडाऊन सुरु आहे. अनेक सरकारी कार्यालये बंद असल्याने लोकांची कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत. ३१ मे पर्यंत देशात लॉकडाऊन असणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

देशात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनांची कागदपत्रे, पीयूसीसारख्या कागदपत्रांची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याचसोबत १ फेब्रुवारीपासून ज्या लोकांचे वाहन परवाने, कागदपत्रे नुतनीकरणाविना रखडले आहेत त्यांना कोणताही वाढीव दंड आकारणार नसल्याचं केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.याबाबत केंद्र सरकारने रविवारी सूचना दिल्या आहेत.अलीकडेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयातून ३० जून २०२० पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे या कागदपत्रांचे नुतनीकरण अशक्य असल्याने मोटार वाहन अधिनियम १९८८ आणि मोटार वाहन अधिनियम १९८९ नुसार ही मुदत वाढविण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे देशातील शासकीय परिवहन कार्यालये बंद झाल्यामुळे केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ३२ आणि ८१ च्या आदेशानुसार नागरिकांना विविध शुल्काबाबत / अतिरिक्त शुल्काबाबत अडचणींना तोंड द्यावं लागत आहे म्हणून सरकारने ३१ जुलैपर्यंत ही मुदतवाढ दिली आहे.



रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट