उल्हासनगरात कोरोना ग्रस्तांचा आकडा १८० वर .
- by Rameshwar Gawai
- May 24, 2020
- 917 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात कोरोना ग्रस्तांचा आकडा दिवसे दिवस वाढतच चालला आहे . काल एकट्या संम्राट अशोक नगर मध्ये १३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हे नगर कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे .या नगरात एकुण ३९ रुग्ण झाले असुन यातील १९ रुग्ण बरे होवुन घरी आले आहेत . तर आता २० रुग्ण कोविड १९ रुग्णालयात उपचार घेत आहेत .
उल्हासनगर शहरात एप्रिल मध्ये एक ही रुग्ण नसताना मे महिन्यात मात्र कोरोना रुग्णांचे पेव फुटलेत . खन्ना कंपाऊंड . ब्राम्हण पाडा संम्राट अशोक नगर . संभाजी चौक . श्रीराम नगर या ठिकाणी रुग्ण मिळायला लागलेत . या सर्व ठिकाणी रुग्णांची संख्या वाढतच होती . महापालिकेने कोरोना रुग्ण असलेले ठिकाण सील केलेले आहेत . तरी पण या रुग्णांची साखळी मात्र तुटलीच नाही . दिवसे दिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. तर शहरात आता पर्यंत या रुग्णांची संख्या १८० झाली आहे . जे रुग्ण कोरोना बाधित आहेत त्यांच्या संपर्कातील लोकाना क्वारंटाईन करन्यात येत आहे . मग त्यातुनच हे रुग्ण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येतात . दरम्यान ज्या लॅब मध्ये स्वॅब जातात त्या लॅब मधुन पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे रिपोर्ट येतात . परंतु हे रिपोर्ट खरे आहेत की खोटे आहेत या बाबत संशय व्यक्त होत आहे . तर काल एकुण १४ रुग्ण पॉझिटिव्ह आले असुन यात संम्राट अशोक नगरचेच १३ रुग्ण आहेत . त्यामुळे हे नगर कोरोनाचा हॉटस्पॉट झाल्याचे दिसुन येत आहे .

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम