गरीब व गरजू लोकांसाठी तसेच परप्रांतीय विस्थापितांसाठी जेवणाचे वाटप. एस एस टी महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम.

उल्हासनगर / प्रतिनिधी : नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या उल्हासनगर मधील एस एस टी महाविद्यालयाने लॉकडाऊन च्या या कठीण काळातही गरीब व गरजू लोकांना जेवणाच्या पाकिटांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

एस एस टी महाविद्यालय  विविध शैक्षणिक उपक्रमांसोबतच  सामाजिक उपक्रमांमध्येही नेहमीच अग्रेसर असते सध्याच्या या लॉकडावूनच्या काळामध्ये सर्व जग थांबलेले असले तरी महाविद्यालयाने शिक्षणाचा आपला वसा सुरूच ठेवला आहे. ऑनलाइन यंत्रणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य सुरू ठेवलेले तर आहेच पण त्यासोबतच आपले सामाजिक दायित्व जपण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण बल( एन डी आर एफ ) यांच्या सोबत मिळून १०००० जेवणाच्या पाकिटांचे वाटप नुकतेच केले. उल्हासनगर मधील विविध भागात पोहचून गरीब व गरजू लोकांना या जेवणाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. यात एस एस टी महाविद्यालया पासून सुरुवात करून कुर्ला कॅम्प ,हिल लाईन पोलीस स्टेशन, उल्हासनगर नं ३ मधील ओ टी सेक्शन,उल्हासनगर स्टेशन पश्चिमेकडील म न पा शाळा क्र २५ ,विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन पूर्व,विठ्ठलवाडी बस स्थानक अश्या विविध परिसरात जाऊन १०००० पाकिटांचे वाटप केले.यात विशेष म्हणजे विठ्ठलवाडी बसस्थानक परिसरातील १००० पेक्षा जास्त परप्रांतीत विस्थापिताना जेवणाच्या पाकिटांचे वाटप केले

या उपक्रमामध्ये महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ पुरस्वानी, डी एल एल इ युनिटचे प्रा. दिलीप आहुजा, एन एस एस युनिटचे प्रा. मयूर माथूर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ भारती पुरस्वानी , डॉ संतोष करमानी, डॉ हिना मूलपानी, श्री. दीपक मूलपानी, प्रा.देविदास जळकोटे, प्रा.दीपक गवादे श्री. स्वप्निल नलावडे यांच्या सोबत डी एल एल इ चे स्वयंसेवक विद्यार्थी बॉबी गायकवाड, आकाश लुंड,ईशान छटलानी,कृष्णा सबरवाल,शिवकुमार गुप्ता,अजय भारद्वाज आणि एन एन एस चे स्वयंसेवक विद्यार्थी मोहित हसवानी रमेश सरोज,अमरजीत गुप्ता, अंकुश सोनावणे, योगेश भालेराव यांनी सहभाग घेतला .तसेच या विठ्ठलवाडी बस स्थानकात परप्रांतीय विस्थापितांसाठी जेवणाच्या पाकिटांचे वाटप करण्यासाठी  कोळशवाडी पोलीस स्टेशनच्या  कर्मचारी वर्गाचे विशेष सहकार्य लाभले.

संबंधित पोस्ट