
उल्हासनगर भाजपा कडून राज्य सरकार विरोधात आंदोलन .
- by Rameshwar Gawai
- May 22, 2020
- 820 views
उल्हासनगर / प्रतिनिधी :शहरात करोना व्हायरसने धैमान घातले असून करोना ग्रस्तांचा आकडा वाढत आहे.यावर नियंत्रणा बाबत ठोस उपाय सुचविण्या ऐवजी महाविकास आघाडी सरकार कसं निष्क्रिय आहे. यासाठी उल्हासनगर शहर भाजपा कडून "महाराष्ट्र बचाओ "आंदोलन करण्यात आलं.सोशल मिडीयावर मात्र या आंदोलनाची आणि आंदोलनकर्त्यांची खिल्ली उडविण्यात आली आहे .
महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारणीच्या आदेशानुसार उल्हासनगर शहर जिल्हा भाजपाच्या वतीने शहरात ठिक - ठिकाणच्या भाजपा कार्यालया समोर हातात फलक घेऊन ,काळ्या फिती लावून महाराष्ट्र बचाओ आंदोलन भाजपा आमदार कुमार आयलानी, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष जमनू पुरुस्वानी,यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं.
महाराष्ट्र राज्य सरकारने ५० लाख करोडाचे पँकेज जाहिर करावं, कोविंड १९ वर मोफत उपचार मोफत करण्यात यावा , पोलिस ,सफाई कर्मचारी आणि आरोग्य विभागातील कर्मचा-यांसाठी वेगळं पँकेज घोषित करावं, परप्रातियांची या सरकानं माफी मागावी अश्या मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनास भाजपाचे नगरसेवक ,पदाधिकारी, आघाडी प्रमुख, भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
दोन महिन्यां पासून शहरात करोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे.करोना बाधितांनी १५६ चा आकडा गाठला आहे.तर लाँकडाऊनमुळे शहरातील व्यापारी ,कामगार व नागरीक बेरोजगार झाले आहेत.गत दोन महिन्यात भाजपा नेते शहरात कुठंही फिरकतांना दिसले नाहीत. किंवा हवालदिल झालेल्या परप्रांतीयांची काळजी घेतांना दिसले नाहीत.
आज आंदोलन करतांना दिसल्यानं नागरीकांनी सोशल मिडीयावर भाजपा नेत्यांची मात्र चांगलीच फिरकी घेतली. शिवसेनेने मात्र या आंदोलनाला कोणताच प्रतिसाद दिला.नाही.
शहरात लाँकडाऊन असतांना भाजपा नेत्यांकडं छापील फलक आले कुठुन ? असा प्रश्न नागरीकांनी उपस्थित केला असून आंदोलना दरम्यान भाजपा नेत्यांनी लाँकडाऊनचं उल्लंघन केलं की काय ?अशी शंका देखिल उपस्थित केली. आहे.जर याची चौकशी झाली तर हे आंदोलन भाजप कार्यकर्त्यांना महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अवघा महाराष्ट्र लढतोय. राज्य सरकार सर्व पातळ्यांवर विविध उपाययोजना राबवतेय. त्याचबरोबर डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करुन अहोरात्र कोरोनाचा शर्थीने सामना करतोय. असे असताना महाराष्ट्राच्या एकत्रित प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी कमकुवत करणारे काळे आंदोलन करून भाजपाने कोरोनाचा मुकाबला करणाऱ्या योद्धांचा अवमान करून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना शहर प्रमुख आणि सभागृह नेते राजेंद्र चौधरी यांनी दिली.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम