स्वरा" या सामाजिक संस्थेच्या वतीने गरजू व वंचित लोकांसाठी अन्नधान्याचे वाटप.

उल्हासनगर/प्रतिनिधी  : सर्वत्र कोरोना व्हयरस चा प्रादुर्भाव वाढत असून या लॉक डाऊन मुळे गोर गरिबांना रोजगार पासून वंचित व्हावा लागत असल्याने त्यांच्या समोर जीवनयापन चा प्रश्न उपस्थित झाला आहे अश्या संकटसमयी उल्हासनगरातील सोशल वेलफेअर अँड रिसर्च असोसिएशन "स्वरा" या सामाजिक संस्थे  ने मदती हात पुढे केला आहे. 

या संस्थेच्या माध्यमातून आता पर्यंत ठाणे जिल्यातील उल्हासनगर, अंबरनाथ आणि विठ्ठलवाडी येथील असंघटीत कामगार, स्थलांतरित मजूर, घरेलू कामगार महिला रिक्षाचालक यांच्या ७००  कुटुंबाना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे. किमान १ महिना पुरेल असे जीवनावश्यक  वस्तू यांची किट स्वराकडून कुटुंबाला दिल्या जातात. या किट मध्ये पुढील वस्तू दिल्या जातात त्यात तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळ, साखर, मीठ, गोडतेल, मसाले, चहा, साबण इतर वस्तू चा समावेश आहे कोरोना व्हायरसमुळे भारतातीलच नव्हे तर जगातील व्यवहार  ठप्प झाले आहेत. लाँकडाउन नंतर वंचित,दुर्बल,दुर्लक्षित रोजंदारी वर पोट भरणारे यांच्यावर विलक्षण परिणाम होत आहे.

यामध्ये समाजामधील दुर्बल घटक जसे की असंघटीत कामगार, मजूर,अपंग, महिला, लहान मुले, एकटे राहत असलेले वृद्ध हे जास्त त्रस्त आहेत. यासोबत बाहेर राज्यातील स्थलांतरित कामगार ज्यांची मदत करण्यासाठी कुणी नातेवाईक किंवा सरकारी सवलती मिळण्यासाठी त्यांच्याकडे कागदपत्रे नसल्यामुळे त्यांच्यावर  उपासमारीची वेळ आली आहे.

अश्या गरजू  लोकांना स्वरा च्या माध्यमातून धान्य आणि जीवनावश्यक वस्तू रुपात  मदत करण्याचा प्रयत्न  सतत सुरु आहे. वाटप  करत असताना  कोरोना  प्रतिबंध संबंधित आणि सोशल  डिस्टंसिन्ग साठी संपूर्ण खबदारी घेण्यात  येत आहे .  

या कामासाठी स्वराचे संस्थापक डॉ. राहुल डोंगरदिवे, सह- संस्थापक ॲड  मयुरेश जगताप, यांनी परिश्रम घेतले. यामध्ये स्वयंसेवक सशांक गायकवाड, गणेश मोरे, करण जाधव, अभिषेक मोरे, भूषण जाधव, सागर गायकवाड आणि सौरव डोंगरे, राहुल वेलकर यांनी विशेष सहकार्य केले.

संबंधित पोस्ट