उल्हासनगरात आँनलाईन दारु विक्रीचा फज्जा. वाईनशाँप वाल्यांकडून सोशल डिस्टन्स नियमाचे उल्लंघन.

मनपा आणि पोलिस प्रशासन अनभिज्ञ .

 उल्हासनगर / प्रतिनिधी :  उल्हासनगर मनपा क्षेत्रात आँनलाईन दारु विक्रीला मान्यता देण्यात आली आहे. मात्र वाईनशाँप मालक घरोघरी दारु पोहचविण्या ऐवजी दुकांनातूनच दारु विक्री करत असल्याच दिसून येत आहे.त्यामुळे गि-हाईकांनी वाईन शाँप समोरच गर्दी केल्याचं चित्र सर्विकडं दिसत आहे. यामुळे वाईनशाँप वाल्यांकडून सोशल डिस्टन्सच्या नियमाचे उल्लंघन होत असतांना पालिका आणि पोलिस प्रशासना कडून वाईन शाँप मालकांवर कोणतीच कारवाई होत नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राज्यांची विस्कटलेली आर्थिक घडी निट बसावी म्हुणून, लाँकडाऊनमुळे बंद असलेल्या दारू विक्रीला मान्यता देण्यात आली.कही अटी - शर्ती नुसार ठाणे जिल्हाधिका-यांच्या परवांनगीने उल्हासनगरात आँनलाईन दारु विक्रीला मुभा दिली. यात वाईनशाँप वाल्यांनी आँनलाईन  मागणी नुसार घरी जाऊन दारु देणे, तसेच बिल देणं अनिवार्य आहे. विशेष म्हणजे सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.असे असतांना वाईनशाँप मालक दुकानं उघडून दारु विक्री करत आहेत . बिलही देत नाहीत.याचा अर्थ हे दुकानदार डूप्लीकेट दारु विकत असावेत अशी शंका काही नागरीक घेत आहेत.

या आधीही लाँकडाऊनच्या काळात शहरात बेकायदेशीररित्या दारू विक्री होत होती.फरक फक्त किंमतीचा होता. १५०/-रू. ५००/- रू.मिळत होती .तर १०/-रू किंमतीचा गावठी दारूचा पाऊच १००/- रू विकला जात होताच. यामुळे शासनाचं प्रचंड अबकरी शुल्काचं नुकसान होत होतेच.

 या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसां  कडून इंग्रजी आणि गावठी दारुची तस्करी करणा-यांवर कठोर कारवाई केली. लाखोंची दारु जप्त करण्यात आली.काही भट्टया उध्वस्त करण्यात आल्या.मात्र पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागा कडून जप्त केलेली दारु गेली कुठं? हा संशोधनाचा विषय झाला आहे.

राज्य शासनाला आर्थिक संकटात हे उत्पन्न बुडवन देणं महाग पडलं असतं. म्हणून पर्यायी आँनलाईन दारू विक्रीचा पर्याय निवडावा लागला.

 यात हि वाईन शाँपवाले ई.पी.ऐवजी डिपी.चा माल (दारु) विकत आहेत. यामुळे शासनाचं प्रचंड आर्थिक नुकसान आहे.याबाबत पालिका आणि पोलिस प्रशासन अनभिज्ञ असल्याचं समजते.

   उल्हासनगर कोरोना अपडेट्स

उल्हासनगरातील कोरोनाग्रस्तांची संख्या १५५

 आज आलेल्या कोरोना चाचणी अहवाला नुसार ११नवे करोना बाधित रुग्ण आढळून आल्यानं कालच्या १४४ वरुन हि संख्या १५५ झाली आहे.

  यात हाँटस्पाँट असलेल्या खन्ना कंपाऊंड मधिल -६ ,सम्राट अशोकनगर - १ आणि अन्य विभागातून - ३ या सर्वांना उपचारासाठी कोविंड रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 सद्यस्थितीत ११७ रुग्ण उल्हासनगच्या कोविंड रुग्णालयात उपचार घेत असून बरे झालेले रुग्ण -३३, मृतांची संख्या -५ अशी कायम आहे.  आयुक्त म्हणून नव्यानं नियुक्त  झालेले समिर उन्हाळे यांची शहरातील वाढत्या    कोरोना व्हाय रस संक्रमना बबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.यामुळे नागरिक मात्र हवालदिल झाले आहेत.या शहराला कुणी अधिकृत वाली आहे की नाही.अशी चर्चा सुरु आहे.

संबंधित पोस्ट