समाजसेवक व उद्योगपती ठाकुर चांडवानी यांचा अनोखा उपक्रम प्रभागातील नागरीकांसाठी फ्री सँनिटायझर सेवा

उल्हासनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि प्रसिध्द उद्योगपती ठाकूर चांडवानी यांनी प्रभाग क्र. १७ मधिल नागरीकांचे करोना व्हायरस संक्रमणा पासून संरक्षण व्हावे, म्हणून फ्री सँनिटायझर टनेल तयार केलं आहें.त्याच्या या अनोख्या उपक्रमाचे संपुर्ण प्रभागातून कौतुक होत आहे.

शहरातून दोन नंबरचा करोना पाँझिटिव्ह रुग्ण प्रभाग १७ मध्ये  पोलिसांच्या रुपात  मिळून आला. आणि हा परीसर प्रकाश झोतात आला.सदर परीसर कंटेमेंन्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला . आज या परीसररात अद्याप तरी एकही रुग्ण पाँझिटिव्ह आढळून आलेला नाही. मात्र शहरात कोविंड-१९ व्हायरसने थैमान घातले आहे.

प्रभाग १७ मध्ये पुन्हा करोना व्हायरसचा प्रार्दुभाव वाढू नये, तसेच या परीसरातील नागरीक सुरक्षित रहावेत या शुध्द हेतुने समाजसेवक व सुप्रसिद्ध उद्योगपती ठाकूर चांडवानी यांनी आपलं सामाजिक दायित्व म्हणून प्रभाग १७ मध्ये बाबा साई नगर उल्हासनगर - ४ येथे सँनिटायझर टनेल उभारलं आहे.

ज्यामुळे येथून येणारे - जाणारे नागरीकांना त्याचा फायदा होणार आहे. जेव्हा नागरीक सँनिटायझर टनेल मध्ये प्रवेश करतील, तेव्हा त्यांच्यावर १० - १५ सेकंड जंतूनाशक फवारणी होईल.आणि नागरीकांच करोना पासून संरक्षण होणार आहे.

माजी नगरसेक आणि राजाविर  बेकरीचे  मालक ठाकूर चांडवानी यांच्या या अनोख्या उपक्रमाचे प्रभाग १७ मधून कौतुक होत आहे.यावेळी उपस्थित पत्रकारांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.वास्तविक  पहाता शहरातील सर्व विद्यमान नगरसेवकांनी आपल्या प्रभागां मध्ये अश्या प्रकारचे सँनिटायझर टनेल उभारणे गरजेचे आहे. असे केल्यास करोनाग्रस्ताच्या वाढत्या आक्रमनाला आळा बसेल आणि शहर लकरच करोना मुक्त होईल असे मत मा.नगरसेक व जेष्ठ पत्रकार दिलिप मालवणकर यांनी व्यक्त  केले.

उल्हासनगर करोना बाधितांचा आकडा १३७. 

आज आलेल्या करोना चाचणी अहवाला नुसार ब्राम्हणपाडा -३, खन्ना कंपाऊंड - ३ ,चोपडाकोर्ट - १ ,ओ.टी.सेक्शन उल्हासनगर ४  - २, आणि  संभाजीचौक -१ असे एकुण १० पाँझिटिव्ह रुग्ण मिळून आल्यानं करोना बाधितांची संख्या १३७ झाली आहे.या पैकी  १६ रुग्ण बरे झाले असून ५ रुग्ण मृत पावले आहेत.तर ११६ रुग्ण उल्हासनगर आणि अन्य ठिकाणच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

एकीकडे करोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतांना दुसरीकडे पालिका प्रशासनाने आगामी पावसाचा विचार करुन डागडूजी, आणि इतर आवश्यक कामांसाठी दोन दिवस पावसातील उपयोगी वस्तु खरेदी करीता सकाळी  ८ ते १० या वेळत दुकानं उघडण्याची परवांनगी काही अटी -शर्तींवर दिली आहे.याचा काय परीणाम होतो.?तसेच व्यापारी आणि नागरीक सोशल डिस्टन्सचं किती पालन करतात? याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

संबंधित पोस्ट