कोविड - १९ च्या संग्रामातील "द रिअल हिरो - विशाल बच्छाव .

उल्हासनगर  :  कोरोनाच्या प्रादुर्भावाने अखंड देश हादरला आहे .तरीही समाजातील काही घटक असे आहेत की जे  नागरिकांच्या आरोग्य रक्षणाकरिता स्वतःचे प्राण तळ हातावर घेऊन लढत आहेत . समाजानेही पोलीस , डॉक्टर्स, नर्स ,सफाई कर्मचारी यांं कोरोनाा वाँरिअरने फुलं उधळून ऋण व्यक्त केले आहे. परंतु, यातही देशभरातील दुर्ललक्षितांं पैकी या कोविड - १९ च्या संग्रामातील अँब्युलन्स चालक आणि वाहकही सन्मानाचे तितकेच हक्कदार आहेत. यांचेच प्रतिनिधित्व करणारा उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील १०८ - अँब्युलन्स चालक, 'द रिअल हिरो आहे विशाल बच्छाव. 

महाराष्ट्र शासन संचलित राष्ट्रीय आरोग्य अभियान प्रकल्पांतर्गत ची  ही १०८ अँब्युलन्स कधीच वेळेवर येत नाही, ड्रायव्हर डाडतुड , टंगळमंगळ करतात. या नेहमीच्या तक्रारींना छेद देत गेली ६ वर्षांपासून विशालने आजवर हजारो अत्यवस्थ, अपघातग्रस्त रुग्ण ठाणे, कळवा, मुंबई येथे योग्य उपचारासाठी तातडीने पोहोचवले आहेत . कित्येक गरोदर, प्रसुत मातांंना त्यांंच्या ईच्छित स्थळी सुखरूप पोहचवलं आहे .आता  गेली दोन महिने तो कोरोनाग्रस्त रुग्णांना आपली निस्वार्थी अत्यावश्यक सेवा निर्भिड पणे देत आहे्

उल्हासनगर या दाटीवाटीच्या शहराला कोरोना झपाट्याने विळखा घालत आहे . शहर भरातील कोरोना बाधित रुग्णांना त्यांच्या घरुन आणणे, तपासणी साठी कँप ४ मधिल कोविड रुग्णालयात दाखल करणे, उपचारासाठी मुंबई येथे पोहचविणे आणि त्यापैकी कुणी दगावल्यास त्या रुग्णांना स्मशानभूमीत सोडणे ही जबाबदारी विशाल दोन महिन्यांपासून अत्यंत प्रामाणिक निष्ठेने पार पाडत आहे . गेली दिड महिने विशाल आणि त्यांचा सहकारी देविदास राठोड हे शहरातच घर असुनही आपल्या घरीही न जाता २४ तास ही सेवा पुरवित आहेत .

विशालने या दोन महिन्यात आपला मुलगा आपली आई,  मुली आणि पत्नी यांना न भेटता, अन्नपाण्याची तमा न बाळगता  निरपेक्षपणे ही आपली सेवा देऊ केली आहे. त्याची मुलं आठवणीने खूप रडतात. पण व्हिडीओ काँल, तर कधी फोन करून  तो त्यांची व स्वतः ची समजूत काढून घेतो. त्याचा राहण्याचा श्रीराम नगर हा विभाग संपूर्ण पणे सील झाला आहे .  त्यामुळे कुटुंबाची काळजी त्याला सतत सतावते.  कधी कधी तर अँब्युलन्स मध्येच थोडीशी डुलकी घेऊन ही २४ तास आँनकाँलवरची अत्यावश्यक अँब्युलन्सची सेवा देणाऱ्या  या चालक वाहकांकडे  बहुदा कुणाचेच लक्ष जात नाही.  या अविभाज्य दुव्यास साधं कुणी फुल देत नाही की, कौतुकाचे दोन शब्द ही नाहीत. हे अत्यंत दुर्दैवीच ना अनेकदा बाधित रुग्णांना उचलावे लागते. एक काँल संपेना तोच दुसरा खणाणत असतो. अहोरात्र ड्रायव्हिंग करुन आजवर शेकडो बाधित तसेच संशयित रुग्णांची ने - आण करतांना विशालचे हात कधीच थरथरत नाहीत. रोज सकाळी पिपीई किट अंगावर चढवतांना मृत्यु  कोणत्याही वळणावर दबा धरून आपली वाट पाहत असेल हा धोका त्याला ठाऊक असतो . परंतु, सारे  देश आपल्या बांधवांचे जीवन वाचवण्यासाठी धडपडत आहेत . या अत्यावश्यक सेवेत आमचाही खारीचा वाटा आहे. याचा आम्हाला अभिमान आहे.  विशाल च्या डोळ्यात चिंतातुर समाधानाच्या लहरी उसळत होत्या. देशभरातील या संक्रमणाच्या भयावह स्थितीत आपल्या सुखाची होळी करुन सामाजिक व देशनिष्ठेने भारलेला हा विशाल बच्छाव   " द रिअल हिरोच आहे.  विशाल सारख्या अशा लाखो रुग्ण चालक आणि वाहकांसाठी  एक टाळी , एक फुल , कौतुकाचा एक सलाम तर व्हायलाच हवा ना.

संबंधित पोस्ट