
स्थानिक गोर-गरिब नागरिकांसाठी सोशल किचन सुरूच ठेवावे .टप्प्याटप्प्याने बंद करु नये मनसे ची मागणी.
- by Rameshwar Gawai
- May 18, 2020
- 920 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात लॉकडाऊन सुरू झाल्या पासून विविध राज्यातील मजुर व नाका कामगार, हातमजुरी करणारे, धुनी-भांडी करणारे, हातगाडी चालक तसेच विविध क्षेत्रात मोलमजूरी करुन रोज कमावून रोज खाणारे असे असंख्य लोक आजही शहरात वास्तव्यास आहेत. त्याना विविध सामाजिक संस्था तसेच प्रशासनाच्या माध्यमातून दोन वेळेसच जेवण पुरवल जात होते. परंतु आपल्या जिल्ह्यातुन परप्रांतिय मजूर गेल्याच कारण पुढे करीत प्रशासना मार्फत दिले जाणारे दोन वेळेसच जेवण टप्प्याटप्याने बंद करावयास घेतले आहे. आणि ही बाब गंभीर आहे असे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी सांगितलं आहे. स्थानिक मजुरांना ज्यांच्याकडे शिधापञिका आहे व त्यांना शिधा (राशन) मिळते असे कारण देत प्रशासनाने सर्वच किचन बंद करावयास घेतलेत हे बरोबर नाही असा आरोप बंडू देशमुख यांनी केला आहे .
आत्ता सुध्दा बरेच मजूर उल्हासनगर शहरात असून ते गावी गेलेले नाहीत. त्याच प्रमाणे मोलमजूरी करुन पोट भरणारे स्थानिक मराठी व ईतर भाषिक लोक आजही शहरातच आहेत त्यांना दोन वेळ जेवणाची गरज आहे. आपले प्रशासन त्यांना गहु आणि तांदूळ देत आहे. परंतु ते खायचे कशासोबत हा प्रश्न सुध्दा या नागरिकांना भेडसावत आहे, तसेच महाराष्ट्रातील सुध्दा बऱ्याच हातमजूरांकडे आजही शिधापञिका(राशन कार्ड) नाही ही बाब ही बंडू देशमुख यांनी जिल्हा अधिकारी व तहसिलदार यांच्या निदर्शनास आणून दिली आहे . व हा लॉकडाऊन शिथिल होई व पर्यंत संपेपर्यंत सार्वजनिक(Community) किचन सुरू ठेऊन या लोकांची भुख भागवावी जेणे करुण आपल्या शहरात अन्नाअभावी कोणी आपला जिव गमावणार नाही आणि ती आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे देशमुख यांनी मांगणी करताना सांगितले आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम