कोरोना विरुध्द लढणाऱ्या योध्दाना होमियोपॅथिक औषधाचे वाटप .

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरातील डॉक्टर . व अन्य स्टॉफ कोरोना विरुध्द लढत आहेत . त्यांची प्रतिकार शक्ती वाढावी म्हणुन उल्हासनगरातील एक महिला डॉक्टर यानी कोणती अपेक्षा न ठेवता  निस्वार्थ पणे कोरोना या विषाणू शी लढणाऱ्या  योध्दांना स्वतःच रक्षण व्हाव यासाठी  होमियोपॅथीक  औषधेचे किट्स वाटप केले आहेत . 

मानेरे गाव उल्हासनगर ४ येथे पार्थ क्लिनिक या नावाने डाॕ. साधना गायकर यांचा होमियोपॅथिक  दवाखाना आहे. या दवाखान्यातुन  कोरोना विषाणूशी लढणाऱ्या  शासकीय कर्मचारी. पोलीस, डाॕक्टर, नर्स, महापालिकेचे कर्मचारी, सफाई कामगार, विद्यार्थी व आशा वर्कर यांना डॉ .साधना गायकर ह्या होमीओपॕथीक किट्सचे वाटप करीत आहेत.त्या या किट्सचे कोणतेही शुल्क स्विकारत नाहीत. त्यांनी आतापर्यंत  १४०० किट्स चे वाटप केले आहे . होमियोपॕथीक औषधांचे सेवन केल्याने कुठेही  साईड इफेक्टस होत नाहीत. तर या औषधांना केंद्राच्या  आयुष मंत्रालयाकडून ही परवानगी आहे. या होमीयोपॅथीक औषधा चे सेवन केल्यास रोग प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे रुग्णासाठी हे महत्वाच ठरतं आहे.  तर आयुक्तांनी सुध्दा डॉ .साधनां  गायकर यांना पत्र देऊन

 तुम्ही सरकारच्या गाईड लाईन नुसार होमियो पॅथीक  औषधं कोविड १९  च्या पेशन्टला देऊ शकता.असे पत्रात म्हाटले आहे.

संबंधित पोस्ट