हमी पत्रानुसार अंत्यसंस्कार केले नाहीत म्हणून मृत कोरोना ग्रस्तांच्या तीन ही मुलावर गुन्हा दाखल !

उल्हासनगर / प्रतिनिधी : कोरोनाग्रस्त असल्याचे ठाऊक असूनही अंत्यविधीचे नियम न पाळणा-या एका कोरोनाग्रस्त मयत व्यक्तीच्या तीनही  मुलावर   मध्यवर्ती पोलीस स्टेशन मध्ये  गुन्हा नोंदविण्यात आला  आहे.हा गुन्हा   आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशाने सहाय्यक आयुक्त भगवान कुमावत यानी दिलेल्या तक्रारीवरुन दाखल करन्यात आला आहे .   

उल्हासनगर कॅंप ३ शांतीनगर येथिल खन्ना कंपाऊंडमधे राहणा-या एका व्यक्तीचा  कोरोना मुळे मृत्यू झाला.त्याचा कोरोना रिपोर्ट येण्याआधीच तो रूग्ण मरण पावला.दरम्यान मृतांच्या  नातेवाईकांच्या आग्रहा खातर सदर व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने  नातेवाईकांकडून कोरोना रूग्णाच्या अंत्यस्काराच्या वेळी जे नियम आखून दिलेले आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे हमीपत्र लिहून घेतले होते. मात्र नातेवाईकांनी सदर नियमांची सर्रास पायमल्ली करीत यथासांग विधीवत अंत्यसंस्कार केले.त्यात मृतदेहास आंघोळ घालण्यापासून  सर्व सोपस्कार करण्यात आले.अंत्यसंस्कारासही नियमभंग करून मोठ्या प्रमाणात लोक सामिल झाले होते.

सदर मृत व्यक्तीचा अहवाल   दुस-या दिवशी पाॅझिटिव्ह आल्याने खन्ना कंपाऊंडमधे एकच खळबळ माजली.लगेच हा परिसर कंटोनमेंट झोन करण्यात आला. परवाच या मृतव्यक्तीच्या ९  नातेवाईकांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला.तर सुमारे ७०  लोकांना क्वारंटाईन  करण्यात आले आहे. त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. नातेवाईकांच्या हलगर्जीपणामुळे या परिसरात  कोरोनाचा फैलाव झाल्याने हमीपत्र लिहून देऊनही मनमानीपणा करणा-या मृत व्यक्तीचे चंदन विश्वनाथ यादव . शेखर विश्वनाथ यादव . व जगन्नाथ विश्वनाथ यादव या तीन ही मुलावर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त भगवान कुमावत यानी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशा नुसार मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . या गुंह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक दिपाली वाघ ह्या करत आहेत .

संबंधित पोस्ट