
उल्हासनगरात अकस्मात पणे १५ कुत्र्यांचा दुर्देवी मृत्यु
- by Rameshwar Gawai
- May 15, 2020
- 728 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरातील आशेळा पाडा परिसरात काल १५ भटक्या कुत्र्यांचा अचानकपणे मृत्यु झाल्याच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून या मागिल सस्पेंस मात्र कायम आहे.
शहरातील सि.एच.एम. काँँलेज परिसरात ११ एप्रिल रोजी अचानक ३० कावळे मरण पावले होते.या घटनेमुळे शहरात एकच गोंधळ निर्माण झाला होता.या कावळ्याच्या मृत्युचं कारण सी.एच.एम. काँलेज प्रशासना कडून स्पष्ट झालेलं नसताना. बरोबर एक महिन्या नंतर काल १४ एप्रिल रोजी शिवसमर्थ नगर गणपती मंदीर आशेळापाडा उल्हासनगर - ४ परिसरात १५ भटके कुत्रे अकस्मात मृत्यु पावल्याच्या घटनेची बातमी शहरात पसरली .यामुळे एकच खळबळ उडाली.स्थानिकांनी याची माहिती क.डो.मनपा प्रशासनाला दिल्या नंतर आरोग्य विभागानं मृत पावलेल्या कुत्र्यांची विल्हेवाट लावली.
याबाबत स्थानिकांनी सांगितले की चोरी करण्याच्या उद्देशानं कुत्र्यांवर विष प्रयोग केला असावा,कारण एकाच जागेवर हे कुत्रे मेले आहेत बाकीच्या जागेतील कुत्रे शाबूत आहेत कुत्र्यांच्या मृत्यु मागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम