
आता यापुढे वकिल दिसणार पांढऱ्या शुभ्र कपड्यात; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
- by Adarsh Maharashtra
- May 14, 2020
- 1608 views
नवी दिल्ली: वकिलांना व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान नेहमीचा काळ्या रंगाचा कोट किंवा रोब घालण्याचं बंधन नसल्याची माहिती न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे वकील हे आता पांढऱ्या शुभ्र कपड्यात दिसणार आहेत. वकिलांना नवा ड्रेस कोड देण्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला आहे.
युक्तीवाद करताना वकील केवळ पांढरा शर्ट आणि नेक टाय वापरू शकणार आहेत. त्यांना त्यावर काळा कोट घालण्याची गरज नसल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. 'व्हर्चुअल कोर्ट सिस्टिममध्ये सुनावणीदरम्यान वकील प्लेन पांढरा शर्ट, महिला वकील पांढऱ्या रंगाची सलवार-कमीज, साडी तसेच गळ्याभोवती प्लेन पांढरा नेकबँड वापरू शकतात.
सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एक उपाययोजना म्हणून तात्पुरत्या स्वरुपात हा निर्णय घेतला आहे. तसेच यासंदर्भात एक निवेदन जाहीर केलं आहे. कोरोना संदर्भातील परिस्थिती कायम आहे किंवा पुढील आदेश येईपर्यंत ही सवलत देण्यात आली आहे. वैद्यकीय सल्ल्याला अनुसरुन हा निर्णय घेण्यात आला आहे' असं यामध्ये म्हटलं आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम