उल्हासनगरात कोरोना बाधिताआकडा पोहचला ८१ वर कोरोनाचा चौथा बळी .

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात दिवसे दिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चालला असुन काल दिवस भरात ११ कोरोना रुग्णाची वाढ झाली आहे . त्यामुळे उल्हासनगर मधिल नागरिकांच्या चिंतेत भर पडली असुन काल एका ६६ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यु झाला आहे . आता पर्यंत शहरात कोरोना बाधित चार जणांचा  मृत्यु झाला आहे

 उल्हासनगर शहरात कोरोनाचे दोन हॉटस्पॉट झाले असुन याच ठिकाणी कोरोना चे रुग्ण मिळत आहेत . संम्राट अशोक नगर मध्ये राहणारी ६६ वर्षीय महिलेला तिच्या मुलाने श्वास घेन्यास त्रास होत असल्याने तिला कॅंप ३ येथिल सत्य साई प्लॅटिनम या रुग्णालयात १० मे रोजी उपचारा करिता दाखल केले होते . त्या महिलेचा त्याच दिवशी रुग्णालयात एक्स रे करन्यात आला होता . दरम्यान त्या महिलेचा कोरोना टेस्ट करिता स्वॅब घेवुन खाजगी लॅब मध्ये तपासणी करिता पाठवले होते . तर  एक्स रे मध्ये काय आहे हे त्या रुग्णालय प्रशासनाने त्या महिलेच्या मुलाला सांगितले नव्हते . त्या महिलेच्या मुला कडुन तीस हजार रुपये डिपॉझिट सुध्दा त्या रुग्णालय प्रशासनाने जमा करुन घेतले होते . मात्र १३ मे रोजी त्या रुग्णालयातील डॉ . किरण हे त्या महिलेच्या मुलाला रुग्णाला दुसरी कडे घेवुन जाण्यास सांगितले . दरम्यान त्या महिलेच्या मुलाने समाजसेवक शिवाजी रगडे पत्रकार रामेश्वर गवई व भारत अहिरे याना फोन करुन प्लॅटिनम रुग्णालय प्रशासन महिलेला दुसरी कडे घेवुन जाण्यास दबाव टाकत असुन पुन्हा तीस हजार बिल भरण्यास सांगत आहे असे सांगितले तेव्हा रगडे गवई अहिरे यानी त्या रुग्णालयात जावुन डॉ किरण याना चांगलेच धारेवर धरले . मात्र त्या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती या रुग्णालय प्रशासनाला मिळाल्यावर त्यानी तो अहवाल त्या रुग्ण महिलेच्या मुलाला  सांगितलाच  नाही फक्त पैसे भरा व रुग्णाला घेवुन जा ही एकच रट रुग्णालय प्रशासनाने सुरु ठेवली होती . अखेर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ रिजवानी याना रुग्णालयात बोलवन्यात आले . तेव्हा त्यानी त्या महिलेची फाईल चेक करुन त्या महिलेला बाहेर हलवायचे नाही असा दम डॉ किरण याना देवुन डॉ रिजवानी निघुन गेले . परंतु या रुग्णालय प्रशासनाने त्या महिलेवर अतिदक्षता विभागात कोणतेच उपचार केले नसल्याचे दिसुन येते . तर अखेर त्या महिलेला १३ मे रोजी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशाने कोविड १९ रुग्णालयात रात्री ९ वाजता हलवन्यात आले . परंतु त्या महिलेचा अखेर रात्री ११ वाजता मृत्यु झाला . मात्र प्लॅटिनम रुग्णालयाचा यात अक्षम्य दुर्लक्षित पणा झाला आहे हे रुग्णालय पैशा करिता रुग्णांच्या जीवाशी खेळत आहे या रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांवर दबाव आणन्या करिता बॉंसर ठेवन्यात आले आहेत . कोणी रुग्णाचा नातेवाईक काही बोलले तर हे बॉंसर दादागिरी करतात . म्हणुन आयुक्त देशमुख साहेब यानी या रुग्णालयावर कारवाई केली पाहिजे अशी मांगणी रुग्णांचे नातेवाईक करत आहेत . दरम्यान उल्हासनगरात कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे . एकुन ८१ रुग्ण उल्हासनगरात  असल्याने नागरिक भितीच्या वातावरणात जगत आहेत . कॅंप ३ येथिल संम्राट अशोक नगर व ब्राम्हण पाडा हे दोन ठिकाण कोरोनाचे हॉटस्पॉट झाले असल्याने याना कॅंटेनमेंट झोन म्हणुन जाहीर केले असुन दोन्ही झोन सील करन्यात आले आहेत . या दोन्ही झोन मधिल कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या काही लोकाना क्वारंटाईन केले आहे . आता त्यांचे काय अहवाल येतात या कडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे .

संबंधित पोस्ट