हाँटस्पाँट परीसरातून एकाच दिवशी १९ करोनाग्रस्त रुग्ण , करोना बाधितांचा आकडा ६८ वर पोहचला .
- by Rameshwar Gawai
- May 13, 2020
- 282 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हास नगर मध्ये एकाच दिवसात १९ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल समोर आल्याने कोरोना बधितांचा आकडा ६८ वर पोहोचला आहे.शहरात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
शहरातील ज्या परीसरातून करोना बाधित रुग्ण मिळून येत आहेत.तो परीसर सील करुन संबंधित रुग्णाचे नातेवाईकांंना आणि संपर्कांत आलेल्या व्यक्तिंंना क्वाँरंटाईन करुन त्यांचे स्वाँब तपासणी साठी पाठवले जातात.त्यांचा रिपोर्ट आल्या नंतर संबंधित व्यक्तिला कोविंड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येते.तर ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे . त्यांना घरी सोडण्यात येते.
मंगळवारी सांयकाळी कोरोटाइन करण्यात आलेल्या संशयीतांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात चिंता व्यक्त केली जात आहे. कॅम्प-२ गोल मैदान परिसरातील अमित अपार्टमेंट मध्ये दोन दिवसांपूर्वी एक व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा त्याच्या परिवारातील सदस्यांना कोरेटाइन केलं होत त्यातील ३लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.कॅम्प - ३ येथील ब्राह्मणपाडा परिसरात ८ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत तर सम्राट अशोक नगरमध्ये ४ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच गोल मैदान परीसरातून ३ रुग्ण बाधित झाले आहेत संशयीत १९ रुग्णांचा अहवाल बाधित आल्याने शहरात कोरोना बधितांचा आकडा ६८वर पोहोचला आहे. तर मंगळवारी दुपारी चोपडा कोर्ट परीसरातील एक दुधवाला बाधित झाला असून त्याला कोविंड रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
यामुळे पालिका प्रशासना समोर करोना संसर्गाला आळा घालण्या बाबत प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे.उल्हासनगरला आता करोना हाँटस्पाँट चटके बसू लागल्यानं करोनाग्रस्तांचा आकडा कितीवर स्थिर होतो.याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम