ईगल ईन्फ्रा इंडियाच्या कार्यालयाला लागली आग लाँकडाऊनमुळं जिवितहानी नाही ,

शाँँकसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज.

उल्हासनगर : आज सकाळी  दहा वाजण्याच्या सुमारास चोपडा परिसर  येथिल ईगल इन्फ्रा इंडिया प्रा.लि.कार्यालयाच्या  चौथ्या मजल्यावर अचानक आग लागली आगीचं स्वरूप इतकं भयान असल्यानं  परिसरात एकच खळ बळ उडाली लाँकडाऊन असल्यानं याआगीत कोणतीही जिवित हानी झाली नाही. अग्नि शामक दलाने अथक परिश्रम करुन आग शमवली.

उल्हासनगर कँ. -३ चोपडा कोर्ट परीसरात ईगल इन्फ्रा इंडिया प्रा.लि. कंपनीचे चार मजली इमारतीत कार्यालयआहे.हि कंपनी महापालिका नगरपालिका व शासकीय कामांचे ठेके घेते.उध्दव रुपचंदानी याच्या मालकीची हि कंपनी आहे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या कार्यालयाला आग लागल्याचं समजताच ,उल्हासनगर महापालिका अग्निशामक दलाचे प्रमुख  भास्कर मिरपगार , बाळू नेटके ,संदिप आसेकर ,पंकज पवार आदि घटनास्थळी पोहचले.

आगीच  स्वरूप इतकं भयान होतं की इमारतींचा चौथा आणि पाचवा मजला जळून खाक झाला. ८ अग्निशामक दलाच्या गाड्यासह जवळ पास दोन अडीच तासाच्या परिश्रमाने अग्निशामक दलाच्या जवांनां आग विझविण्यात यश आलं.

लाँकडाऊन असल्यानं कार्यालय बंद होतं.त्यामुळे या आगीत कोणतीही जिवित हानी झाली नसून सदरची आग शाँट सर्किट मुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाचे प्रमुख भास्कर मिरपगार यांनी सांगितले. याबाबत मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

संबंधित पोस्ट