शेतीची कामे रोजगार हमीने करण्याची मागणी

■ ग्रामशक्तीचे अध्यक्ष जयेश शेलार यांनी दिले विविध मागण्यांचे निवेदन

पालघर (प्रतिनिधी):र्वत्र कोरोना या रोगाचा संसर्ग वाढत असून या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लाॅकडावूनचा फटका शेतक-यांना बसला आहे. तर अगोदरच या वर्षीच्या ओल्या दुष्काळाने हैराण झालेले शेतकरी अधिकच संकटात सापडला आहेत.  म्हणून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतीची बांध-बंदिस्ती, पेरणी, लावणी, कापणी ही सर्व कामे रोजगार हमी योजनेतून करण्याची मागणी ग्रामशक्ती संस्थेचे अध्यक्ष जयेश शेलार यांनी केली आहे.

 याबाबतचे निवेदन त्यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अन्य मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत. 

1) पिक विम्याची रक्कम शासनाकडून भरण्यात यावी. 

2) यावर्षी शासनाच्या कर्ज माफी योजने अंतर्गत कर्ज माफी मिळालेल्या शेतक-यांना नवीन पिक कर्ज त्वरीत वाटप करावे.

3) या वर्षीचा ओला दुष्काळ व कोरोनामुळे लागू झालेला लाॅकडावून यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याने पिक कर्ज 31 मार्च 2020 पूर्वी भरु शकलेले नाहीत, अशा शेतक-यांनाही नियम शिथिल करुन या हंगामासाठी पिक कर्जाचे त्वरीत वाटप करावे.

4) नियमित पिक कर्ज भरण-या शेतक-यांना शासनाकडून प्रोत्साहनपर अनुदान म्हणून जाहीर झालेली रु.50000/- ही रक्कम मिळावी, तसेच नियमित पिक कर्ज भरणा-या शेतक-यांना पिक कर्जावर व्याज माफी मिळावी.

5) शेतक-यांना शेती कामासाठी सवलतीच्या दरात डिझेल व इतर इंधन उपलब्ध करुन दयावे.

6) सर्व अल्पभूधारक व गरजू शेतक-यांना शेतकरी हा निकष ग्राहय धरून रेशनिंगवर अन्न-धान्य व इतर सामुग्री मिळावी.

8) शेतक-यांना बि-बियाणे व खते यांच्यावर अधिकची सवलत दयावी तसेच बि-बियाणे व खते यांची उपलब्धता सुलभतेने व्हावी.

9) शेतक-यांना सहकार्य करण्यासाठी व वेळोवेळी सल्ला देण्यासाठी कृषी व अन्य शासकीय खाती अधिकाधिक लोकाभिमुख करण्यात यावे.

आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

संबंधित पोस्ट