उल्हासनगरातील ब्राह्मणपाडा नवा हाँटस्पाँट आठ पाँझिटिव्ह रुग्ण ,एकुण संख्या ४९ ; मृत्यु -३

उल्हासनगर :  काल  सकाळी शहरातील ब्राह्मणपाडा,शांतीनगर उल्हासनगर - ३ परीसरातील ८ रुग्ण पाँझिटिव्ह आढळून आले आहेत.या परीसरातून आता पर्यंत १३ कोरोनाग्रस्त रुग्ण मिळून आल्यानं  शहरातील कोरोना ग्रस्तांची संख्या ४९ झाली असून ३ जण मृत्यु पावले आहेत.त्यामुळे हा परिसर  नवा हाँँस्पाँट ठरला आहे.सदर परिसर  कंटेनमेंन्ट म्हणून या पुर्वीच घोषित करण्यात आला असून नागरीकांनी घरातच रहावे,   परिसरा बाहेर पडू नये . असे आव्हान पालिका प्रशासना कडून करण्यात आलं आहे.


 काही दिवसां पुर्वी या परिसरात  राहाणारा, मुबंई येथे पोलिस खात्यात कामाला असणारा व्यक्ती कोरोना पाँझिटिव्ह ठरला होता.त्याच्या कुटुंतील सदस्य देखिल पाँझिटिव्ह ठरले होते.या सर्वांचा उपचार उल्हासनगरच्या कोविंड हाँस्पिटल मध्ये सुरु आहे.दोन दिवसां पुर्वी याच परिसरातील ५५  एक वर्षीय व्यक्ति मृत्यु पावला होता.त्या व्यक्तीचा  रिपोर्ट आज पाँझिटिव्ह आला. तसंच या पोलिसाच्या संपर्कांत असलेल्या इतर जणांची आरोग्य चाचणी करण्यात आली होती.त्यापैकी ७ जणांचा अहवाल पाँझिटिव्ह आला असून त्या सर्वांना कोविंड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तसेच ज्युपिटर हाँस्पीटल मध्ये उपचार घेत असलेल्या ८ वर्षिय  मुलीची कोरोना   चाचणी पाँझिटिव्ह आली आहे.ही  मुलगी उल्हासनगरची रहिवासी आहे.काल ब्राह्मणपाडा येथिल एक आणि पेन्सिल फँक्टरी श्रीरामनगर परीसरातील करोना पाँझिटिव्ह असलेल्या पिता -पुत्रां पैकी पित्याचं निधन झालं आहे.त्यामुळे मृत झालेल्यांची संख्या ३ झाली आहे

दोन दिवसांपुर्वी उल्हासनगरातील सम्राट अशोक नगर परीसरातून ११ रुग्ण मिळून आले होते.या परीसरात आणखी संसर्ग वाढू नये म्हणून या परीसरातील सर्व अत्यावश्य सेवा बंद करण्यात आल्या आहेत.आयुक्त सुधाकर देशमुख ब्राह्मणपाडा परीसरातील अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित पोस्ट