देशाच्या ख-या नायकांना सन्मान मिळाला पाहिजे-आर.के. सिन्हा

नुकतीच देशातील दोन 'रिल' आणि 'रिअल लाईफ' नायकांनी रुपेरी पडदा आणि जगातून 'एक्झिट' घेतली. त्यांच्या जाण्याची देशभर उमटलेली प्रतिक्रीया आश्चर्यकारक होती. रुपेरी पडद्यावरील आपल्या अभिनयाने मंत्रमुग्ध करणारे इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या निधनाने देशात अभूतपूर्व शोक लहर निर्माण झाली. ऋषी कपूर यांनी सुमारे 50 वर्ष चित्रपट सृष्टीत एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या आहेत. आपल्या विविदास्पद विधानांमुळे ते मधल्या काळात चर्चेत होते. परंतु, ते लोकप्रिय कलावंत होते यात तीळमात्र शंका नाही. या दोघांच्या निधनानंतर काश्मिरात दहशतवाद्यांचा बिमोड करताना सैन्य आणि निमलष्करी दलाचे काही अधिकारी आणि जवान शहीद झालेत. काश्मिरातील हंदवाडा परिसरातील एका गावात 1 में रोजी झालेल्या चकमकीत एक कर्नल, मेजरसह 5 जवान शहीद झालेत. यामध्ये कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद आणि जम्मू-काश्मीरचे पोलिस उपनिरीक्षक शकील काजी यांचा समावेश होता. परंतु, मातृभूमीसाठी युद्धात हौतात्म्य पत्करणा-या जवानांच्या निधनानंतर काही औपचारिक प्रतिक्रीया आल्यात. काही लोकांनी आपल्या फेसबुक वॉलवर यासंदर्भातील बातम्या शेअर केल्यात. सोशल मिडीयाच्या आभासी जगात वंदन आणि जयहिंदचे सोपस्कार याशिवाय दुसरे काही होऊ शकले नाही. तेव्हा देशासाठी प्राणांची आहुती देणा-या या जवानांना काय मिळाले ? केवळ सोशल मिडीयावरील आभासी 'वंदन' आणि जय हिंद म्हणण्याची औपचारिकता इतकेच, हे वीर केवळ एवढ्याच सन्मानाच्या लायकीचे होते का ? त्यामुळे देशाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. काश्मिरातील कठीण परिस्थितीत हे जवान निर्भीडपणे काम करीत असताना आम्ही त्यांच्या त्यागाला इतके कमी का लेखतो ?

चित्रपटाची चंदेरी दुनिया आपल्या अभिनयाने संमृद्ध करणारे इरफान खान आमि ऋषी कपूर यांची तुलना सैन्यातील योध्द्यांशी करणे हा माझा हेतू नाही. मला फक्त इतकेच अधोरेखीत करायचे आहे की, आभासी जगातील नायक आणि देशाचे खरे हिरो यांच्यातील अंतर आम्ही अजूनही ओळखू न शकणे अतिशय लाजीरवाणे आहे. एका गोष्टीचे समाधान आहे की, कर्नल शर्मा, मेजर अनुज सूद यांच्यासह शहीद झालेल्या 5 जवानांचा बदला घेण्यास अधिक वेळ दवडावा लागला नाही. सुरक्षादलांनी दोन चकमकीत कुख्यात दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले. हिजबुल मुजाहिद्दीनचे कमांडर रियाज नायकू देखील मारल्या गेला. नायकूला पुलवामा येथील त्याच्या घरा जवळच ठार करण्यात आले. त्याच्या डोक्यावर 12 लाख रुपयांचे बक्षीस होते. चित्रपटातील नयाकांवर प्रदीर्घ चर्चा करणा-या किती लोकांना ठाऊक आहे की, नायकू सारख्या दहशतवाद्याला वाचवण्यासाठी भारताचे शत्रू आमच्या सैनिकांवर दगडफेक करीत होते ? इरफान खान आणि ऋषी कपूरच्या अभिनय यात्रेवर लिहीणारे आणि बोलणारे लोक सैन्यावर दगडफेक करणा-यांवर का लिहीत नाहीत ? देशातील जनतेने 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांचे स्मरण केलेय ? कधी त्यांच्या कुटुंबियांची वास्तपुस्त काढली ? या शहीदांच्या कुटुंबियांना अजूनपर्यंत सरकार किंवा समाजाकडून अपेक्षित मदत मिळू शकलेली नाही हे कटू सत्य आहे. त्यांना अजूनह सरकारी मदतीची प्रतीक्षा आहे. पुलवामा हल्ला झाला त्यावेळी गळे काढणा-यांचे प्रमाण खूप होते. सर्वांनी पिडीतांच्या कटुंबियांना मदतीचे आश्वासन दिले. परंतु, ही सारी आश्वासने फक्त कादगावरच शिल्लक राहिलीत. आणखी भूतकाळात जाऊन डोकावले असता 2008 सालचा मुंबई हल्ला देखील आठवतो. त्यावेळी तुकाराम ओंबळेंनी आपल्या जीवावर उदार होऊन अजमल आमिर कसाब या दहशतवाद्याला जीवंत पकडले होते. तुकाराम ओंबळेंना स्वतःचा जीव वाचवणे सहज शक्य होते. परंतु, त्यांनी स्वतःच्या जीवपेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व दिले. पराक्रमाचे असे उधारण सहसा सापडत नाही. देशाने तुकाराम ओंबळेंना मरणोपरांत अशोकचक्र देऊन आपले कर्तव्य पूर्ण केले. त्यानंतर सर्वांनाच त्यांचा विसर पडला. तुकाराम ओंबळेंसारख्या पराक्रमी शूराला असे विस्मृतीत टाकणे योग्य आहे का ? एखादा विषय निघाला की मग तो खोलवर गेल्याशिवाय राहत नाही. कारगिल युद्धात नोएडा येथील विजयंत थापर देखील शहीद झाले होते. नोएडा शहरातील एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले. परंतु, लोक त्यांच्या नावाच्या पाटीवर पोस्टर लावण्याचा कृतघ्नपणा करतात. शहीद विजयंत थापर

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट