सुभाषनगरात गल्ल्या गटारींची दुरावस्था संकटकाळी नगरसेवक गायब .

उल्हासनगर : कोरोनाच्या वैश्विक संकटात जनसंपर्क साखळी तोडण्यासोबतच परिसर स्वच्छ व निर्जंतुकीकरण करण्याचा तोडगा सर्वत्र अवलंबण्यात येत आहे . मात्र 
उल्हासनगर नं  ३ , मध्ये  सुभाष नगरात एकीकडे कोरोनाचा फैलाव तर दुसरीकडे कमालीचे घाणीचे साम्राज्य यामुळे येथील नागरिक दुहेरी कात्रीत सापडले आहेत. यासंदर्भात प्रशासनास अनेकदा अर्ज विनंत्या  करुनही निरुपयोगी ठरलेत. तर अशा भयावह संकटकाळात जनप्रतिनिधी परागंदा झाल्याची खंत येथील सामाजिक कार्यकर्ते शिरसाट यांनी मांडली आहे. 

 पॕनल नं (८) या परिसरात  शिरसाट गल्लीची अवस्था गेला कित्येक महिन्यांपासून गंभीर आहे. येथील दुर्गंधी मुळे  नागरिकांना येण्यासाठी प्रचंड त्रास मात्र सहन करावा लागत आहे .तर  अक्षरशः तोंड नाक दाबून जावे लागते. वेळीच या गल्लीची दुरुस्ती न झाल्यास एखादा भयंकर  अपघात  होण्याची शक्यता  नाकारता येत नाही. या बाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व भारतीय बौध्द महासभेचे माजी अध्यक्ष  एफ ए शिरसाट यांनी अनेकदा उल्हासनगर महापालिका आणि नगरसेवकांना  तक्रारी केल्या आहेत.  मात्र स्थानिक नगरसेवकांना या अत्यावश्यक सेवेची दखल घ्यायला दुर्दैवाने वेळच नाही.तर   उल्हासनगर महापालिका याकडे मुद्दाम लक्ष देत नाहीत असा आरोप शिरसाट यांनी केला आहे.
सुभाषनगर मधील  शिरसाट गल्ली  ते यांच्या घरापर्यतच्या रस्त्याची दशा गंभीर झाली आहे .  रस्त्यावरील काही गटारीचे झाकणं तुटलेली  असून या रस्त्यावर नियमित स्वच्छतेचा अभाव आहे.   तसेच   पॕनल नं  ९ मध्ये सुध्दा १९७२ पासुन अस्तित्वात असलेल्या  सार्वजनिक शौचालयांची साफ सफाई होत नाही.  या सार्वजनिक शौचालयांना दरवाजे ,  भांडे ,  तुटलेली आहेत.  याकडे मात्र नगर सेवक , सफाई मुकादम  व उल्हासनगर महापालिका वर्ग यांचे बेफिकीरीचे दुर्लक्ष होत असल्याचे आरोपही  शिरसाट यांनी केले आहेत. 

संबंधित पोस्ट