गरोदर महिलेला कोरोनाची लागण
- by Rameshwar Gawai
- May 07, 2020
- 427 views
उल्हासनगर : उल्हासनगर शहरात कोरोनावर मात करण्या करिता पोलिस आरोग्य यंत्रणा महापालिकेचा आरोग्य विभाग दिवस रात्र कार्यरत आहे . पण एक एक दिवस रुग्ण मिळतच चालले आहेत . घाटकोपर वरुन बहिणीच्या घरी आलेल्या गरोदर महिलेची कोरोना चाचणी केली असता तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे . तेव्हा उल्हासनगरात कोरोना रुग्णांची संख्या आता १८ झाली आहे . तर कल्याण येथिल मीरा हॉस्पिटलला महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यानी नोटीस पाठवुन स्पष्टीकरण मांगितले आहे .
उल्हासनगर महापालिका कोरोना संक्रमण होवु नये म्हणुन आटोकाट प्रयत्न करत असतानाच शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे . एकंदर आता पर्यंत १८ रुग्ण शहरात झाले आहेत . दोन दिवसापुर्वी एक गरोदर महिला घाटकोपर येथुन कॅंप ४ मधील संभाजी चौक या ठिकाणी आपल्या बहिणी कडे आली होती तर तिला कल्याण येथिल एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते . तेथे तिची करोना टेस्ट करण्यात आली होती दरम्यान तिचा कोरोना टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . तर ती ज्या बहीणीकडे आली होती . त्या संभाजी चौकातील तिच्या बहीणीच्या घरच्या एकुण १० पेक्षा अधिक लोकाना कॅंप ५ येथिल साई टेऊराम आश्रमात क्वारंटाईन करण्यात आले आहे . तर त्या महिलेला कॅंप ४ येथिल कोविड १९ रुग्णालयात उपचारा करिता दाखल केले आहे . दरम्यान चार दिवसा पुर्वी कॅंप ३ येथिल सम्राट अशोक नगर मधिल एका ३० वर्षीय महिलेला कल्याण च्या मीरा हॉस्पिटलवाल्यानी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला महापालिकेला न कळवता मध्यवर्ती रुग्णालयात आणुन सोडले होते . त्यामुळे त्या रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी समाजसेवक शिवाजी रगडे यानी आयुक्ताना केली होती तेव्हा आयुक्तानी मीरा हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस पाठवुन स्पष्टीकरण मांगितले आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम